Next
'सीएसआर' निधीतून मतिमंद मुलांच्या निवासी शाळेला मदत
BOI
Friday, January 11, 2019 | 05:19 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘ॐ श्री साई ॐ मतिमंद मुलांची निवासी शाळा व पुनर्वसन केंद्र’ या संस्थेला ‘एशियन पेंट्स लिमिटेड’ या कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून आणि ‘जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. संस्थेसाठी आवश्यक अशा साहित्यांच्या स्वरूपात ही मदत केली गेली.

अनिकेत सेवाभावी संस्था संचलित ‘ॐ श्री साई ॐ मतिमंद मुलांची निवासी शाळा व पुनर्वसन केंद्र’ याठिकाणी ४२ अनाथ मतिमंद विद्यार्थी आहेत. या मुलांसाठी काम करणारे १० कर्मचारी आहेत. ‘एशियन पेंट्स’ आणि ‘जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने निवासी शाळेला १५०० लिटरचे गरम पाण्याचे सोलार हिटर, संगीत वाद्यांपैकी तबला आणि पेटी, खेळण्यासाठी टेबल टेनिस किट आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मेणबत्ती युनिट याप्रकारच्या साहित्यांची मदत करण्यात आली आहे.
 
संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी ‘एशियन पेंट्स लिमिटेड’च्या खंडाळा येथील कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक कमल छौडा आणि दीपक बुट्टे उपस्थित होते. तसेच ‘जनसेवा चॅरिटेबल सेंटर’चे पुण्याचे अध्यक्ष अविनाश खाटिकपाटील आणि संचालक अनिता खाटिकपाटील हेदेखील उपस्थित होते. 

याप्रसंगी निवासी शाळेच्या प्रमुख कल्पना वर्पे यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच या दोन्हीही संस्थांच्या वतीने मिळालेल्या साहित्याबद्दल त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खाटिकपाटील यांनी केले, तर गणेश तानपुरे यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search