Next
मदुराई ते उझबेकिस्तान
BOI
Thursday, October 25, 2018 | 10:30 AM
15 0 0
Share this story

सहलीला जाताना दोन पर्याय उपलब्ध असतात. एक स्वतःच सर्व व्यवस्था करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पर्यटन कंपनीबरोबर आरामात जाणे. यातील ‘कंडक्टेड’ टूरमधून आलेल्या अनुभवांचे कथन श्रीनाथ पेरूर यांनी ‘मदुराई ते उझबेकिस्तान’मधून केले आहे.

२०११ आणि २०१२ या दोन वर्षांत त्यांनी दहा टूर केल्या. यात देशांतर्गत आणि युरोप व उझबेकिस्तानची सहल, तसेच पंढरीची वारी आणि पारंपरिक ज्ञानाच्या शोधात गावोगाव केलेल्या ‘शोधयात्रे’चाही समावेश आहे. तमिळनाडू टुरिझमच्या बसने केलेली टूर ही देवदर्शन सहल ठरली हे सांगताना लेखकाने निवृत्त झालेल्या प्रौढ सहप्रवाशांच्या आठवणी, मंदिरे आणि भिकारी आदींवर भाष्य केले आहे.

युरोप ट्रिपमध्ये तेथील शिस्तबद्ध वातावरण, शिस्तबद्ध व्यवहार व स्थळदर्शनाचा अनुभव वेगळाच ठरतो. राजस्थानमधील टूरमध्ये उंटावरून फेरी मारताना शारीरिक त्रास कसा जाणवतो हे यातून समजते. उझबेकिस्तानच्या सहलीतील ‘सेक्स टुरिझम’, मुंबईतील धारावी दर्शन व पंढरपूरच्या वारीतील वर्णन यात आहे. स्थळदर्शनाबरोबर मानवी मनाचे अनेक कंगोरेही यातून समोर येतात. याचा मराठी अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे.

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : १९६
किंमत : २४० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link