Next
‘अॅकॉर्ड’मध्ये अत्याधुनिक उपकरणांचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this article:



पिंपरी : येथील अॅकॉर्ड एसडीएच हॉस्पिटलमध्ये युरो लेझर आणि न्युरो माइक्रास्कोप ही अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली असून, त्याचे उद्घाटन जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय लेले, उपाध्यक्ष जगदीश कदम आणि सुप्रसिद्ध युरोसर्जन डॉ. दीपक किरपेकर यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. या प्रकारच्या अद्ययावत यंत्रसामग्रीमुळे रुग्णांना उच्च दर्जाची सेवा देता येणार आहे.

या हॉस्पिटलला पिंपरी-चिंचवडमधील वेस्ट मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. कांटा ३०/३५ डब्ल्यू २१०० मिलीमीटर होल्मियम युरो लेझर विविध युरोलॉजीकल प्रक्रियेसाठी वापरले जाते. विशेषत: कठीण व घट्ट खडे काढण्यासाठी याचा उपयोग होतो. मुत्राशय ट्युमरचे विभाजन, पीसीएनएल आणि ईसीडब्ल्यूएलशिवाय मुत्राशयाचे खडे व मुत्राशय ट्युमरचे उपचार याद्वारे करू शकतो. कार्ल झीस न्युरो माइक्रोस्कोपमुळे अत्यंत अचूक आणि मेंदूच्या महत्त्वपूर्ण भागात विशेषत: रक्तकोशिका व छोट्या नसांपर्यंत पोचण्यासाठी आणि शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूला उद्भवणारी इजा टाळता येते.

उद्घाटनप्रसंगी ‘अॅकॉड एसडीएच’चे अध्यक्ष विद्याधर सरफरे व हॉस्पिटलच्या संचालिका आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. दीपाली चिंचोले उपस्थित होत्या.

या प्रसंगी बोलताना जनता बॅंकेचे अध्यक्ष लेले म्हणाले, ‘प्रत्येकजण स्वस्थ राहिला पाहिजे, अशी माझी नेहमी इच्छा असते; परंतु त्याचवेळी प्रत्येकास वैयक्तिक किंवा व्यवसायिक तणावाचा सामना करावा लागतो. अॅकॉर्ड एसडीएच हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांची रुग्णकेंद्रित सेवा आणि विनम्र वागणूक यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्वांच्या सदिच्छा त्यांच्यासोबत असतील.’

मूत्रपिंडाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल लेले आणि कदम यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉ. किरपेकर यांचा सत्कार केला. डॉ. किरपेकर यांच्याकडे तीन दशकांचा अनुभव असून, त्यांनी आजपर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. या वेळी डॉ. किरपेकर यांनी दर्जेदार सेवा, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा विनम्र स्वभाव आणि अॅकॉर्ड एसडीएच हॉस्पिटलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत रुग्णालयात अनेक सकारात्मक बदल दिसून आले आहे आणि नविन व्यवस्थपनाखाली अत्यानिक यंत्रसामग्रीयुक्त सेवा विकसित होत आहे.’

‘अॅकॉर्ड’च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. चिंचोले म्हणाल्या, ‘हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या गुणवत्तेवर भर दिला आहे; तसेच त्यांनी एनएवीएच मान्यता प्राप्तीसाठी हॉस्पिटलची प्रक्रिया सुरू असून, याचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल. अॅकॉर्ड एसडीएच हॉस्पिटल उच्चदर्जाची रुग्णकेंद्रित सेवा जी सहजगत्या सुलभतेने उपलब्ध होईल, खर्च प्रभावी आणि लोकांच्या गरजा पूर्ण करते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search