Next
यशवंत टिपणीस
BOI
Sunday, December 03 | 04:00 AM
15 1 0
Share this story

तब्बल शतकापूर्वीच्या काळात, ऐतिहासिक काळाशी सुसंगत अशा अत्यंत वास्तववादी वेशभूषेचा, रंगभूषेचा आग्रह धरून त्याप्रमाणे अस्सल ऐतिहासिक पात्रं रंगमंचावर सादर करणारे नाटककार अभिनेते यशवंत टिपणीस यांचा तीन डिसेंबर हा जन्मदिन. आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यानिमित्त त्यांच्याविषयी....
...................
तीन डिसेंबर १८७३ रोजी महाडमध्ये जन्मलेले यशवंत टिपणीस हे गेल्या शतकाच्या पूर्वार्धातले एक महत्त्वाचे नाटककार आणि अभिनेते होते. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक अशी विविध प्रकाराची १५हून जास्त नाटकं लिहिली आणि २०हून जास्त नाटकात भूमिकाही केल्या. आपल्या बऱ्याच नाटकांसाठी त्यांनी पदंही लिहिली होती. १९२१ साली पुण्यात भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

नाटकामध्ये पात्रांना जास्तीत जास्त खऱ्या स्वरूपात सादर करण्यासाठी ते आग्रही असायचे आणि असं म्हणतात, की आपल्या १९१८ सालच्या (शंभर वर्षांपूर्वी) ‘चंद्रग्रहण’ नाटकांत त्यांनी पहिल्यांदा शिवाजीराजांच्या पात्राला संपूर्ण आपादमस्तक वेशभूषेत पेश केलं होतं. 

जरासंध, नारद, मत्स्यगंधा, राधामाधव, चंद्रग्रहण, दख्खनचा दिवा, नेकजात मराठा, राज्यारोहण, शहाशिवाजी, शिक्काकट्यार, शिवाजीला शह, आशानिराशा, कमला, राजरंजन, स्वस्तिक बँक असं त्यांचं नाट्यलेखन प्रसिद्ध आहे. 

२५ मार्च १९४३ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link