Next
‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 05:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘लेनदेनक्लब’ ही वेतनधारक कर्जदारांना कर्ज देणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. या कंपनीला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे, यामुळे या कंपनीला आता बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून व्यवसाय करता येणार आहे.

‘लेनदेनक्लब’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले, ‘बिगरबँकिंग वित्तीय कंपनी ‘पीटूपी’ म्हणून नोंदणी होणे ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक ना एक दिवस नक्की नियमन कंपनी होऊ, या आशेवर आम्ही सुरुवात केली. त्या काळाच्या तुलनेत आताची वेळ म्हणजे एकदम वेगळे युग आहे. या प्रक्रियेमुळे लेनदेन क्लब एक ब्रँड म्हणून अधिक समर्थपणे सेवा देऊन कर्जदारांचा विश्वास वाढवणार आहे.’

‘लेनदेनक्लबची २०१५मध्ये मुंबईत स्थापना झाली. कंपनीला भारताच्या ‘पीटूपी’ कर्ज क्षेत्रात बाजारपेठेत अग्रेसर व्हायचे आहे. हा उद्देश लक्षात घेऊन व्यवसायाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. कंपनी सध्या भारतातल्या पाच शहरांमध्ये कार्यरत असून, लवकरच अधिक शहरांमध्ये प्रवेश केला जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारतभरात कंपनीची उपस्थिती असेल,’ असे पटेल यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link