Next
‘जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी’
BOI
Thursday, May 24 | 04:48 PM
15 0 0
Share this story

संग्रहित फोटोसोलापूर : ‘येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग, तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी,’ अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांना केली.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सेतू सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समन्वय अधिकारी प्रवीण साळुंके यांसह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील पालखी मार्गांमध्ये संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग यांचा प्रत्येक तालुक्यानुसार आढावा घेतला; तसेच सांगली-सोलापूर, टेंभुर्णी-करमाळा, म्हसवड-पंढरपूर, सोलापूर-अक्कलकोट आदी प्रमुख रस्त्यांची कामे, सर्वेक्षण, मोजणी  व भूसंपादन प्रक्रिया या बाबींची माहिती डॉ. भोसले यांनी घेतली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

‘वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत’, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link