Next
‘एमसीई’तर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक
प्रेस रिलीज
Saturday, April 14 | 04:30 PM
15 0 0
Share this story

राज्यघटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बैलगाडीवरील जिवंत देखावा सादर करताना विद्यार्थी.

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे  (एमसीई) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाच हजार विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे उद्घाटन ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते १४ एप्रिलला सकाळी आठ वाजता झाले.

संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणुकीचे हे १४ वे वर्ष होते. दरवर्षी ‘एमसीई’ संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

राज्यघटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बैलगाडीवरील जिवंत देखावा या मिरवणुकीचे आकर्षण ठरला. या देखाव्यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी होते.

डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ अॅड. प्रकाश आंबेडकर, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या अभिवादन मिरवणुकीचे स्वागत केले. या मिरवणुकीत संस्थेतील सर्व विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

दरबार ब्रास बँडची दोन पथके, ढोल-ताशा यांचा मिरवणुकीत समावेश होता. आझम कँपस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कँप चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली.

मिरवणुकीत शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, शाहीद मुनीर शेख, अब्दुल वहाब, प्रा. इरफान शेख, प्रा. मुझफ्फर शेख, डॉ. शैला बूटवाला, प्रा. अनिता फ्रान्झ, प्रा. रबाब खान, प्रा. शाहीन शेख, डॉ. किरण भिसे, डॉ. व्ही. एन. जगताप, प्रा. मुमताझ सय्यद, मसकूर चाँद शेख, सिकंदर पटेल, सहभागी झाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link