Next
‘क्रोमा’मध्ये वीज बचत करणारे इन्व्हर्टर एसी
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 12:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘क्रोमा’ या भारतातील आघाडीच्या ओम्नीचॅनल इलेक्ट्रॉनिक रिटेल व्यवसायाने उन्हाळ्यासाठी वातानुकूलनाच्या साधनांवर अर्थात एअर कंडिशनर्सवर काही सवलत योजना  जाहीर केल्या आहेत. 

सर्व अग्रगण्य ब्रॅण्ड्सच्या एसींवर ग्राहकांना फायद्याच्या ठरतील अशा एक्स्चेंज ऑफर्स, आकर्षक हप्ते योजना; त्याचप्रमाणे सामान्य एसींच्या किमतीतच इन्व्हर्टर एसींची मोठी श्रेणी  क्रोमाने उपलब्ध केली आहे. याशिवाय, ग्राहकाने एक्स्चेंजसाठी आणलेल्या प्रत्येक जुन्या एसीमागे एक झाड लावण्याचा वायदाही  केला आहे. 
 
‘जुन्या ऑनऑफ तंत्रज्ञानावर आधारित एसींच्या तुलनेत इन्व्हर्टर एसी ४० टक्के कमी ऊर्जा वापरतात. त्यामुळे जुने एसी बदलून त्यांच्या जागी हे नवीन एसी लावल्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होईल. गेल्या वर्षी क्रोमामध्ये विकल्या गेलेल्या तीन एसींपैकी एक इन्व्हर्टर एसी होता. जबाबदार ऊर्जावापराच्या संस्कृतीशी बांधिलकी मानणारा ब्रॅण्ड म्हणून हे प्रमाण १०० टक्के करण्याचे ध्येय आम्ही यावर्षी ठेवले आहे,’ असे इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे सीएमओ रितेश घोसाल यांनी सांगितले.
 
ईएमआय अर्थात हप्त्यांचा कालावधी वाढवण्यासाठी क्रोमा अग्रगण्य वित्तीय संस्थांसोबत काम करत आहे; त्याचप्रमाणे जुन्या एसींची विल्हेवाट जबाबदारीने लावण्यासाठी मान्यताप्राप्त व्हेण्डरसोबत काम करत आहे आणि प्रथमच एसी खरेदी करणाऱ्यांना परवडण्याजोग्या किमतीत इन्व्हर्टर एसी उपलब्ध व्हावा म्हणून मूळ उपकरण उत्पादक अर्थात ओईएम्ससोबतही काम करत आहे. 
 
इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविजित मित्रा म्हणाले, ‘आमचे ग्राहक आधुनिक आयुष्यातील सोयींचा आनंद घेतात आणि त्यांना विजेची बिले भरणे परवडते हे आम्हाला माहीत आहे. इन्व्हर्टर तंत्रज्ञानाकडे वाटचाल ही वीजबिलाचे पैसे वाचवण्यासाठी नसून दुर्मीळ होत चाललेला एक स्रोत जतन करण्यासाठी आहे. आपल्या पुढील पिढ्यांचा विचार करून टाकलेले हे पाऊल आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Naik About
Good work. Congratulations.
0
0

Select Language
Share Link