Next
वाघोलीकर, रचना यांना ​इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, May 03, 2018 | 01:09 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ​दुबई ​येथे ​झालेल्या १२ व्या  इंटरनॅशनल अचिव्हर्स समिटमध्ये ​​​संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य सचिव अब्दुल्ला अल सालेह यांच्या हस्ते र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर-शहा यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. ​र्‍हिदम वाघोलीकर हे पुण्यातील २४ वर्षीय युवा लेखक आहेत, तर रचना खडीकर-शहा या लता मंगेशकर यांच्या भाची आणि पुस्तकाच्या अतिथी संपादक आहेत. २८ एप्रिल ​रोजी हा कार्यक्रम झाला.

​दुबई ​येथे ​२८ एप्रिल ​रोजी ​झालेल्या १२ व्या इंटरनॅशनल अचिव्हर्स समिट ​आणि ​​संयुक्त अरब अमिरातीच्या  वाणिज्य ​मंत्रालयाच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर-शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. ‘स्वरलता-रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी’ या ​लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील ​‘द सोल स्टिरिंग व्हाईस- गानसरस्वती किशोरी आमोणकर’ हे ​पुस्तक ‘स्वरमंडळ’ (इंडियन हार्प) आकारात ​छापण्यात आले आहे.

या लेखनाबद्दल​ ​र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर-शहा यांना​ ​‘इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ​सुनील शास्त्री, ​सुधीर वाघोलीकर, ​सुहेल झरूनी या वेळी उपस्थित होते. 

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search