Next
भर पावसात १५० रुग्णांची मोफत तपासणी, औषधोपचार
डॉ. अमोल वाघमारे
Tuesday, July 02, 2019 | 03:39 PM
15 0 0
Share this article:



आंबेगाव (पुणे) :
राजपूर या गावात ३० जून रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण दिवसभर पाऊस असूनही, या शिबिरात सुमारे १५० रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. 



‘महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज’अंतर्गत जेएके एमआर असोसिएशन, जुन्नर, आंबेगाव व राजगुरूनगर युनियन आणि ग्रामपंचायत राजपूर यांच्या वतीने, तसेच किसान सभेच्या स्थानिक संयोजनातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.



डॉ. जालिंदर वाजे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, डॉ. महारुद्र डाके, डॉ. श्याम राऊत यांनी रुग्णांची तपासणी केली. या भागातील अनेक महिलांना अॅनिमिया (रक्ताल्पता) असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

या वेळी युनियनचे सत्यवान काळे, सुहास बाणखेले व सर्व पदाधिकारी, राजपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलताई लोहकरे, पोलीस पाटील उत्तमराव वाघमारे, ग्रामसेविका चिंचपुरेताई, ग्रामपंचायत सदस्य आशाताई, किसान सभेचे अशोक पेकारी, संतोष लोहकरे, कैलास धडवड, सुनीता लोहकरे, संगीता लोहकरे, शिक्षक काळू भांगरे आदी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search