Next
आयपीएस उद्धव कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Saturday, January 19, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘लोकवाङ्मय प्रकाशन संस्थे’तर्फे आयपीएस उद्धव कांबळे यांनी लिहिलेल्या ‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद : नवे आकलन नव्या दिशा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

येत्या सोमवारी (२१ जानेवारी) नवी पेठ येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या हॉलमध्ये संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, डॉ. सुहास पळशीकर आणि डॉ. सुरेंद्र जोंधळे असणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कांगो हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link