Next
चिमुरड्या राधाला इंग्लिश ऑलिम्पियाडचे सुवर्णपदक
BOI
Monday, January 07, 2019 | 12:25 PM
15 0 0
Share this story

राधा सचिन लेलेइचलकरंजी : अवघ्या सात वर्षांच्या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या राधाने सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत शालेय पातळीवर सुवर्णपदक पटकावले आहे. राधा सचिन लेले असे तिचे पूर्ण नाव असून, ती येथील हौसाबाई जयपाल मगदूम पब्लिक हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. 

प्रथमच तिने ही परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवले. नुकतेच तिला हे सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तिच्या या चमकदार यशाबद्दल सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे.

‘मुळातच राधाला भाषांची आवड असल्याने तिने आवडीने या परीक्षेचा अभ्यास केला. शाळेने विशेष मार्गदर्शन करून या परीक्षेला बसलेल्या मुलांची तयारी करून घेतली. घरीही तिने आवर्जून अभ्यास केला. या यशामुळे तिची इंग्रजी भाषेविषयीची गोडी अधिक वाढली आहे,’ असे राधाची आई गायत्री लेले यांनी सांगितले.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Radhika kane About 71 Days ago
Very good radha keep it up.... God bless you.. congratulations!!!
0
0
Manjiri patankar About 71 Days ago
Really Great GBU
0
0

Select Language
Share Link