Next
‘येस बँक’ शाश्वतता अहवाल प्रसिद्ध करणारी पहिली भारतीय बँक
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतामध्ये खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ‘फ्युचर नाउ’ शाश्वत कामगिरी आढावा (सस्टेनेबिलिटी परफॉर्मन्स रिव्ह्यू) जारी केला आहे. ‘टीसीएफडी’च्या शिफारशींनुरूप वर्धित शाश्वत अहवाल प्रसिद्ध करणारी येस बँक ही पहिली भारतीय बँक ठरली आहे. अहवालाच्या स्वरूपासाठी असलेल्या जीआरआय मानकांचे पालन करणारा हा अहवाल सर्वंकष असून, भागधारकांशी संवाद साधून आणि विचारविनिमय करून समोर आलेल्या विविध मुद्द्यांवर त्यात विशेष भर देण्यात आला आहे. ‘केपीएमजी’ने या अहवालाची खातरजमा करून तो जागतिक स्तराचा केला आहे.

याबद्दल येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘येस बँक ही ईएसजी उपक्रमाची कट्टर समर्थक असून, वातावरणाशी संबंधित वित्तीय अहवाल तयार करण्याच्या ‘टीसीएफआयडी’च्या अहवालाचे बँक स्वागत करते. पीएसबी आणि टीसीएफडी यांच्या पुढाकारामुळे वातावरणाशी जोखीम जाणून घेऊन त्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना मिळेल; तसेच योग्य निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होऊन जगभरातील क्लायमेट फायनान्सला प्रोत्साहनन मिळेल. विशेषत: उदयास येत असलेल्या अर्थव्यवस्थांसाठी ते परिणामकारक ठरेल. समग्र अहवालाच्या आराखड्यासह करण्यात आलेल्या शिफारशींमुळे पर्यावरणविषयक उपक्रमासाठी खासगी तसेच सार्वजनिक निधी उभारण्यास आणि भविष्याच्या दृष्टीने व्यवसाय आणखी मजबूत करण्यास अतिशय सहाय्यभूत ठरतील. याद्वारे जागतिक वित्तीय प्रणाली शाश्वत होऊ शकते.’

परिमाणबद्ध, विकासात्मक आणि बाजाराभिमुख सोल्युशन्स उपलब्ध करण्यासाठी ‘फ्युचर नाउ’ची धोरणे स्वीकारून येस बँक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वर्तमानातूच भविष्य उभे राहते, याच विश्वासाने येस बँक यावर्षी देखील अभिनव, परिमाणबद्ध आणि शाश्वत सोल्युशन्सच्या माध्यमातून अनुकूल परिणाम साध्य करण्याचा प्रयत्न करीत असून, यातूनच बँकेचे वेगळेपण दिसून येते. ‘फ्युचर नाउ’ या अहवालातून बँकेचा आर्थिक, पर्यावरणविषयक, सामाजिक आणि प्रशासकीय कारभार समग्ररीत्या मांडण्यात आला असून तो बँकेच्या व्याप्तीचा फेरआढावा घेण्याबरोबरच भागधारकाच्या बदलत्या अपेक्षांचा अंदाजही घेतो.

पॅरिस येथे डिसेंबर २०१७मध्ये फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष ईमॅन्युएल मॅक्रॉन, जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष जिम याँग किम आणि संयुक्त राष्ट्रसघाचे (यूएन) महासचिव अँटोनिओ गुटेरस् या मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या ऐतिहासिक वन प्लॅनेट समिटमध्ये सहभागी झालेली येस बँक ही जगभरातील विविध खासगी बँकांपैकी एक आणि भारतातील एकमेव खासगी बँक होती. त्यात पर्यावरणविषयक जोखीमा आणि संधी यासंदर्भातील ‘टीसीएफडी’ने केलेल्या शिफारशींना जाहीरपणे समर्थन केले होते. सुमारे ६.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके एकत्रित बाजार भांडवल असलेल्या जगभरातील २३७ कंपन्यांनी या शिफारशींना पाठिंबा दर्शविला. त्यापैकी ८१.७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक मालमत्ता असलेल्या जवळपास १५० वित्तीय कंपन्या होत्या. येस बँकेने प्रसिद्ध केलेला हा परिपूर्ण अहवाल म्हणजे जागतिक स्तरावर दिलेल्या वचनाला अनुसरून आहे.

धोरणात्मक प्रगती साध्य करण्याचा आधारस्तंभ म्हणून जबाबदार बँकिंग सेवा देण्याबरोबरच ‘उत्कृष्ट दर्जाची जगातील मोठी भारताची बँक’ म्हणून नावलौकिक मिळविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येस बँक कायम प्रयत्नशील आहे. ईएसजीमध्ये पुढे असलेली येस बँक ही डाउ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय)– इमर्जिक मार्केट्समध्ये सलग तीन वर्षे निवड होणारी पहिली आणि एकमेव भारतीय बँक असून, २०१७साठी एमएससीआय एसीडब्ल्यूआय ईएसजी लीडर्स, एमएससीआय एसीडब्ल्यूआय एसआरआय आणि एफटीएसई४ गुड इमर्जिंग इंडेक्ससाठी देखील येस बँकेची निवड झाली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link