Next
‘डीकेटीई’मध्ये ‘मॉडर्न सिव्हिल इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर्स’वर कार्यशाळा
प्रेस रिलीज
Wednesday, July 24, 2019 | 06:09 PM
15 0 0
Share this article:

इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागामार्फत ‘मॉडर्न सिव्हिल इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर्स’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स स्टुडंट्स चॅप्टर सिव्हिल इंजिनीअरिंग डिपार्टमेंट व कॅड सेंटर ट्रेनिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.  

बांधकाम क्षेत्रात झपाट्याने होत असलेली प्रगती या प्रगतीमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट डिझाइन करण्यासाठी व त्यांच्या निर्मितीसाठी अनेक सॉफ्टवेअर्स वापरली जातात. त्याची माहिती व उपयोगिता विद्यार्थ्यांना कळावी या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

यात कॅड सेंटरचे सीनिअर प्रॉडक्ट इंजिनीअर धवल बागवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बांधकाम क्षेत्रातील सॉफ्टवेअर्सचे महत्त्व समजावून सांगितले. सध्या व्यावसायिक क्षेत्रात वापरली जाणारी आधुनिक सॉफ्टवेअर्स अ‍ॅटोकॅड, स्केच-अप, स्टॅडप्रो, ई-टॅब, थ्रीडी स्टुडिओ मॅक्स, प्राइमवेरा, एमएक्स रोड, स्टॅड फाउंडेशन, अ‍ॅन्सीस, रेव्हिट आदी सॉफ्टवेअर्स विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘डीकेटीई’चा सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देण्यास कटीबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.


कार्यशाळेचे प्रास्ताविक सिव्हिल इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. एम. बी. चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. क्षितिजा बलवान यांनी काम पाहीले. या कार्यक्रमासाठी प्रा. ए. एल. मुल्ला, प्रा. व्ही. डी. साखरे, प्रा. आर. एस. पाटील यांसह इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेला ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search