नवी दिल्ली : हुवेईचा सबब्रॅंड ऑनरने फुल व्ह्यू नॉच डिसप्लेसारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी युक्त असा ‘ऑनर नाईन एन’ हा शैलीदार स्मार्टफोन दाखल केला आहे. हा फोन ३१जुलै रोजी दुपारी१२ वाजल्यापासून केवळ फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, ऑनरच्या अधिकृत स्टोअर्समध्येही तो उपलब्ध असेल.
हा फोन तीन प्रकारांत उपलब्ध आहे. तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी रोम ११ हजार ९९९ रुपयांत, चार जीबी रॅम आणि ६४ जीबी रोम १३ हजार ९९९ रुपयांत आणि चार जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम असलेला फोन १७ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
बारा स्तरांच्या ग्लास कोटिंगने बनलेला हा फोन अत्यंत गुळगुळीत आणि आरशासारखा चकचकीत असून,स्मार्टफोनच्या सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकणारा आहे. लव्हेंडर पर्पल, सफायर ब्ल्यू, मिडनाइट ब्लॅक आणि रॉबिन एग ब्ल्यू अशा चार रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे. फुल व्ह्यू नॉच डिस्प्ले हे खास वैशिष्ट्य असलेल्या या स्मार्टफोनमध्ये व्यावसायिक ‘बोकेह इफेक्ट’ फोटोग्राफीसाठी ड्युअल लेन्स रीअर कॅमेरा, तर उत्तम सेल्फींसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. भारतातील सर्वाधिक अपघात होतात ते दुचाकी वाहने चालवताना फोनकॉल्स घेतल्यामुळे,हे लक्षात घेऊन, ऑनर नीन एन मध्ये ‘राइड मोड’ हे खास वैशिष्ट्य आहे. पार्टी मोड वापरकर्त्याला एका मास्टर उपकरणासोबत सहा स्मार्टफोन्स जोडून संगीत लावण्याची मुभा देतो.
हा स्मार्टफोन दाखल करताना हुवेईच्या इंडिया-कंझ्युमर बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष पी. संजीव म्हणाले, ‘भारतीय ग्राहकांना सर्वोत्कृष्ट दर्जाचे तंत्रज्ञान आणि अनोख्या डिझाइनचा अनुभव परवडण्याजोग्या किमतीत देण्यावर आमचा भर आहे. हा नवीन फोन दाखल करताना आम्हाला खूपच आनंद वाटत आहे. हा फोन भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकणार आहे. युवा ग्राहक या नवीन स्मार्टफोनच्या क्षमतांना दाद देतील अशी आशा वाटते.’
फ्लिपकार्टच्या मोबाइल विभागाचे वरिष्ठ संचालक अय्यप्पन राजगोपाल म्हणाले, ‘फ्लिपकार्टचे धोरण नेहमीच ग्राहककेंद्री राहिले आहे. आमच्या ग्राहकांना किमतीच्या प्रत्येक टप्प्यावर निवडीची सर्वोत्तम संधी देण्यावर आमचा विश्वास आहे. स्मार्टफोन्सच्या सौंदर्य व आकर्षकतेला दाद देणाऱ्या बाजारपेठेला सेवा देण्याच्या आमच्या प्रयत्नांत हे ऑनरचे हे नवे उत्पादन महत्त्वाची भूमिका बजावेल.’