Next
‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण
प्रेस रिलीज
Thursday, October 11, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : येत्या तीन वर्षांत पाच लाख मुलींना शिकवण्याचा निश्चय महिंद्रा समूहाच्या ‘नन्ही कली’ या प्रकल्पाद्वारे करण्यात आला आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या इतर संस्थांशी अधिक चांगल्याप्रकारे समन्वय साधून ‘नन्ही कली’ केंद्रांमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे; तसेच यात काम करणाऱ्या पथकांना अधिक बळकटी दिली जाणार आहे.

महिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘स्त्रिया शिक्षित झाल्यामुळे कुटुंब, समाज व देश दारिद्र्यातून बाहेर पडू शकतात असे प्रतिपादन जागतिक बॅंकेने केलेले आहे. यातूनच स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. दारिद्र्याच्या खातेऱ्यातून भारतीय समाजाची मुक्तता करायची असेल, तर एकही क्षण न दवडता देशातील सर्व मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करावीच लागेल. तीन वर्षांत पाच लाख मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची शपथ घेऊन ‘नन्ही कली’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मुलींना त्यांचा शिक्षणाच्या हक्क मिळवून देणार आहोत. यामध्ये येणारे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अडथळे आम्ही दूर करण्याचा जोमाने प्रयत्न करू.’

भारतात मुली त्यांच्या आयुष्यात सरासरी चार वर्षांहून कमी काळ शिक्षण घेतात, असे दिसून आलेले आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी व दीर्घकालीन उपाय योजण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यायला हवा.

‘नन्ही कली’ हा प्रकल्प महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी १९९६मध्ये सुरू केला. शिक्षित स्त्रिया या केवळ अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देतात असे नव्हे, तर हुंडा व बालविवाह यांसारख्या क्रूर प्रथांचे निर्मूलन करण्यातही पुढाकार घेतात, या जाणिवेतून ‘नन्ही कली’ हा प्रकल्प उभारण्यात आला. आतापर्यंत १४ राज्यांमधील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागांतील साडेतीन लाख मुलींना या प्रकल्पाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात आले आहे. त्यांना शैक्षणिक व तत्सम साहित्य पुरविले जाते. प्रकल्पामधून मुलींच्या शिक्षणाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती व रुढी यांविषयी जनजागृतीही करण्यात येते.

वेबसाइट :
www.nanhikali.org
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search