‘रिचर्ड ज्युरी’ या स्कॉटलंड यार्ड पोलीस इन्स्पेक्टरच्या पात्राभोवती फिरणाऱ्या २४ डिटेक्टिव्ह कादंबऱ्या लिहून अमाप लोकप्रियता मिळवलेल्या मार्था ग्राइम्झ आणि संस्कृततज्ज्ञ लेखक गोविंद केशव भट यांचा दोन मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... .....
मार्था ग्राइम्झ
दोन मे १९३१ रोजी पिट्सबर्गमध्ये जन्मलेली मार्था ग्राइम्झ ही अॅगथा ख्रिस्तीप्रमाणेच डिटेक्टिव्ह कादंबऱ्यांची अत्यंत लोकप्रिय लेखिका! तिच्या ३०हून अधिक कादंबऱ्यांचा ५० लाखांहून अधिक प्रतींचा खप झाला आहे.
ग्राइम्झने ‘रिचर्ड ज्युरी’ हे स्कॉटलंड यार्ड पोलीस इन्स्पेक्टरचं पात्र तयार करून त्याच्यावर २४ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. दी मॅन विथ दी लोड ऑफ मिस्चीफ, दी ओल्ड फॉक्स डिसिव्ह्ड, दी डर्टी डक, डिअर लीप, दी हॉर्स यू केम इन ऑन, व्हर्टिगो ४२ यांसारख्या तिच्या सर्वच कादंबऱ्या पुष्कळच गाजल्या. ‘रिचर्ड ज्युरी’ या व्यक्तिरेखेच्या काही कथांवर सिनेमेही बनले आहेत.
त्या व्यतिरिक्त तिच्या फाउल मॅटर, कोल्ड फ्लॅट जंक्शन, हॉटेल पॅराडाइज, दी एंड ऑफ दी पायर, दी ट्रेन नाऊ डिपार्टिंग अशा कादंबऱ्या गाजल्या आहेत.
तिला १९८३ साली ‘निरो वूल्फ’ अॅवॉर्ड मिळालं होतं, तर २०१२ साली प्रतिष्ठेचा ‘ग्रँड मास्टर’ किताब एडगर अॅवॉर्डस् समितीकडून दिला गेला होता.
...........
गोविंद केशव भट
दोन मे १९१४ रोजी जन्मलेले गोविंद केशव भट हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. ते संस्कृततज्ज्ञ म्हणूनही ओळखले जात. ‘भासकृत नाटके’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.
गृहदाह, प्रणय, अंधार-उजेड, पानझड, संस्कृत नाटके आणि नाटककार, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
१८ जुलै १९८९ रोजी त्यांचं निधन झालं.
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)