Next
कॅल्को पॉली टेक्निकला पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, December 12 | 12:09 PM
15 0 0
Share this story

कॅल्कोचे संस्थापक विजयकुमार गुप्ता व त्यांच्या पत्नी साधना गुप्ता दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहोळ्यात पुरस्कार स्वीकारतानापुणे : कॅल्को पॉली टेक्निकला ‘डी अँड बी एसएमई बिझनेस एक्सलन्स २०१७’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार उत्पादन क्षेत्रातील प्लॅस्टिक व प्लॅस्टिक उत्पादने प्रकारात देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला शासकीय संस्था, बँका, आर्थिक संस्था, टेक जायंट्स आणि एसएमईजचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कॅल्को ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार गुप्ता म्हणाले, “डी अँड बी एक्सलन्स अॅवॉर्ड मिळाल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कॅल्कोचा पुढेही विकास होण्यात व नाविन्यपूर्ण सेवा देण्यास हा पुरस्कार प्रोत्साहन ठरेल.”

कॅल्को पॉली टेक्निक ही भारतातील सर्वांत वेगाने वाढणारी कंपनी असून, ती ग्राहकांना मूल्यवर्धित उत्पादने, सेवा आणि नाविन्यपूर्ण उपाय व अत्यावश्यक उत्पादन विकास विविध बाजार मंडळांमध्ये प्रदान करू इच्छिते. शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कॅल्को ग्रुप हरियाणामध्ये आपला दुसरा प्रकल्प सुरू करणार आहे. हा एक लाख चौरस फूट जागेमध्ये उभारलेला जागतिक दर्जाचा अद्ययावत उत्पादन प्रकल्प आहे. यामध्ये जागतिक दर्जाची मटेरियल हँडलिंग उपकरणे आहेत. याशिवाय कॅप्टिव्ह सोलर पॉवर प्लांट आणि पाणी संवर्धन अशा सुविधा आहेत. हा प्रकल्प वर्ष २०१८च्या अखेरीस सुरू होईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link