Next
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, April 02 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘श्री सालासर हनुमान चालीसा मंडळातर्फे आरसीएम गुजराती हायस्कूल, दारूवाला पुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी तब्बल ७०३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. यावर्षी प्रथमच सुमारे २०० महिलांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला,’ अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.  

श्री सालासर हनुमान चालीसा मंडळातर्फे तीन वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षी ५५७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले होते. यावर्षी घेतलेल्या शिबिरामध्ये दिव्यांगांनी देखील रक्तदान केले. यावेळी नगरसेवक विशाल धनवडे व योगेश समेळ यांनी रक्तदान करताना समाजासाठी नवीन आदर्श घालून दिले.

महाराज श्रीकांतश्री भट्टर, महाराज श्रीकृष्ण भट्टर, महेश सहकारी बँकेचे चेअरमन पूनमचंद धूत, दत्ता कोहिनकर, रामभाऊ बांगड, भगवानदास लढ्ढा, संजय चांडक, सुरेश नावंदर, सत्यनारायण राठी, शाम मुंदडा, नरेंद्र चांडक, दादासाहेब नगरकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी  विशेष मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link