Next
‘येस बँके’तर्फे ‘ग्रीन फ्युचर’ लाँच
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 04:22 PM
15 0 0
Share this story

मुंबई : खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पहिल्यावहिल्या सदहरित उत्पादन जाहीर केले आहे. ग्रीन फ्युचर– सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी (एसडीजी) अलाइन्ड सेक्टर्सद्वार उभारण्यात येणाऱ्या निधीइतकी रक्कम येस बँक देशाचा विकास आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी देणार आहे. त्याशिवाय प्रत्येक ग्रीन फ्युचर डिपॉझिटमागे येस बँक एक मनी प्लँट देणार आहे.

ग्राहकांसाठी खास सवलत म्हणून ग्रीन फ्युचर डिपॉझिट १८ महिने आणि आठ दिवसांपासून, १८ महिने ते १८ दिवस कालावधीपर्यंत उघडता येणार आहे. नेहमीच्या ग्रीन फ्युचर डिपॉझिटसाठी ७.५० टक्के प्रती वर्ष असा सर्वोत्तम दर दिला जाणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर प्रती वर्ष आठ टक्के असेल. ग्रीन फ्युचर डिपॉझिट हे केवळ येस बँकेच्या नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग अप्लिकेशनद्वारे उघडता येणार असून ही प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहीत असल्यामुळे त्यातून शाश्वत भविष्यनिर्मितीस हातभार लागेल.

याविषयी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर, म्हणाले, ‘येस बँकने शाश्वत वित्त क्षेत्रात विविध उपक्रम सुरू करून स्वतःला भारतातील प्रख्यात ग्रीन बँक म्हणून प्रस्थापित केले आहे. येस बँक कायमच शाश्वत बँकिंगची ठाम पुरस्कर्ती राहिली असून भारत सरकारन नुकत्याच लाँच केलेल्या ‘ग्रीन गुड्स डीड्स’ अभियानाला पाठिंबा देण्यात आघाडीवर आहे. नवी ग्रीन फ्युचर – डिपॉझिट सेवा या दिशेने टाकलेले पाऊल आणि या आर्थिक वर्षात येस बँकेतर्फे लाँच होणार असलेल्या विविध पर्यावरणपूरक रिटेल उत्पादनांपैकी पहिले उत्पादन आहे.’

येस बँकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रमांची मालिका जाहीर केली आहे. एसडीजी आणि पॅरिस हवामान करारासह जागतिक बँकिंग क्षेत्राशी सुसंगती साधण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा पाठिंबा मिळालेली येस बँक ही एकमेव भारतीय बँक आहे. त्याचबरोबर क्लायमेट रिलेटेड फायनान्शियल डिस्क्लोजर्सबाबत (टीसीएफडी) फायनान्शियल स्टॅबिलीटीच्या टास्क फोर्सला पाठिंबा देणारी येस बँक ही पहिली आणि एकमेव भारतीय बँक आहे. पर्यावरण व्यवस्थापन धोरण अंमलबजावणीच्या पाचव्या वर्षात येस बँकेने ७४४ वायबीएल ठिकाणांचे सर्टिफिकेशन ऑट यशस्वीपणे पूर्ण केले आहे आणि जागतिक स्तरावरील बँकिंग क्षेत्रातील येस बँकेच्या सर्वाधिक सुविधा ईएमएस कक्षेत येतात. येस बँकेने आपल्या विविध ठिकाणी तयार होणाऱ्या पुनर्नूतनीकरण केलेल्या सुक्या कचऱ्यासाठी प्रायोगिक प्रकल्पही सुरू केला होता. या प्रकल्पाअंतर्गत ९.५ टन सुक्या कचऱ्याचे पुनर्नूतनीकरण करण्यात आले ज्यामुळे प्रत्येक तिमाहीत २७.३५ एमटी कार्बन उत्सर्जन कमी झाले.

‘येस बँके’विषयी :
येस बँक ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक असून, पॅन भारतातील २९ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशात तिचे अस्तित्व आहे. बँकेचे मुख्यालय लोअर परेल इनोव्हेशन डिस्ट्रीक्ट (एलपीआयडी) मुंबई येथे असून, ती बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि उच्च व्यवस्थापन टीम यांच्या व्यावसायिक व औद्योगिक बांधिलकीचे फळ आहे. त्यांनी उच्च दर्जा, ग्राहकाभिमुख सेवा, सेवाकेंद्रित, खासगी भारतीय बँक उभारली आहे, जी भारताच्या भविष्यातील व्यवसायांची गरज पूर्ण करेल.

येस बँकेने आंतरराष्ट्रीय पद्धतींचा अवलंब केला असून, त्यानुसार ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा, कार्यकारी गुणवत्ता, सर्वसमावेशक बँकिंग, आर्थिक सेवा दिल्या जातात. बँकिंगकडे ज्ञानाधिष्ठित दृष्टीकोनातून पाहाण्याची वृत्ती येस बँकेने ठेवली असून, ती आपल्या रिटेल, कॉर्पोरेट आणि उदयोन्मुख कॉर्पोरेट बँकिंग ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या बँकिंग सेवा देते. येस बँक हळूहळू व्यावसायिकांची बँक ऑफ इंडिया बनत असून, २०२०पर्यंत जगातील सर्वोत्तम भारतीय दर्जाची भारतीय बँक असा नावलौकिक मिळवण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link