Next
‘ट्रिनिटी’मध्ये एहसान नुरानी यांचा ‘मास्टरक्लास’
प्रेस रिलीज
Wednesday, October 24, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this article:



पुणे : प्रसिद्ध संगीतकार एहसान नूरानी यांनी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच ‘मास्टरक्लास’ घेतला. एहसान यांच्या साथीने विद्यार्थ्यांची पावले ‘तारे जमीन पर’, ‘कल हो ना हो’, ‘दिल चाहता है’, ‘जिंदा है तो’ या गाण्यांच्या तालावर थिरकली. आपल्या आवडत्या संगीतकारांबरोबर सेल्फी, फोटो, आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली.

टॉरन्स अॅकॅडमीतर्फे ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले जात आहे. या ‘मास्टरक्लास’नंतर रंगलेल्या ‘जामसेशन’मुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या वेळी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रीती सांगवान, टॉरन्स अॅकॅडमीचे सुनील सुंदरन आणि शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



संगीतकार नूरानी म्हणाले, ‘संगीत मला आवडते आणि मी ते जगतो. सतत नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न संगीतकाराने केला पाहिजे. मनातील भीती दूर करून वाजवत राहणे महत्त्वाचे असते. संगीतामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. त्यामुळे एखादे तरी वाद्य वाजवण्यास आपण शिकावे. शाळा-महाविद्यालयांनी संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. ‘ट्रिनिटी’चा पुढाकार कौतुकास्पद आहे. जुन्या काळातील हेमंतकुमार, आर. डी. बर्मन, ए. आर. रहमान हे माझे आवडते संगीतकार आहेत.’



हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, ‘माणसाला जीवनात आनंदी ठेवण्यासाठी संगीत अतिशय महत्त्वाचे आहे. आपण जे संगीत वाजवतो ते स्मरणीय होते. एहसान यांची अनेक गाणे स्मरणात राहणारी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search