Next
पंतप्रधानांनी साधला महिलांशी संवाद
BOI
Saturday, July 14, 2018 | 12:27 PM
15 0 0
Share this article:

वेबकास्टिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना महिला

सोलापूर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गट सदस्यांशी वेबकास्टिंगद्वारे सुसंवाद साधला. या वेळी कृषीपूरक उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे होते. या प्रसंगी पुणे येथील स्वयं शिक्षण प्रयोगचे राज्य कार्यक्रम अधिकारी किरण माने, मोहोळ येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) तालुका समन्वयक राजरत्ना जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ‘माविम’ आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्याअंतर्गत असलेल्या बचत गटातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.

या प्रसारणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील महिला बचत गटातील महिलांशी थेट संवाद साधून महिला बचत गटांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य, व्यवसाय व उत्पादने यांचा आढावा घेतला. महिला बचत गटांनी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जेम (GeM) पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले; तसेच कृषीपूरक उद्योग आणि शेतमाल मुल्यवर्धनावर अधिकाधिक भर देण्याचे नमूद केले. या कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आपापल्या बचत गटाची कार्याची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आयोजित कृषीपूरक उद्योग कार्यशाळेदरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नांद्रे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने विविध कृषीपूरक उद्योगांचे महत्त्व विषद केले; तसेच महिला बचत गटांना विविध उद्योग उभारणीसाठी लागणारे कौशल्य आधारित प्रशिक्षणे देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

तांत्रिक सत्रादरम्यान विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान)दिनेश क्षीरसागर यांनी महिला बचत गटांसाठी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, पॅकेजिंग व गुणवत्ता नियंत्रण, विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान व दुग्धशास्त्र) डॉ. तानाजी वळकुंडे यांनी शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन आणि मुरघास निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले; तसेच विषय विशेषज्ञ (मृदविज्ञान व कृषी सायनशास्त्र) काजल जाधव यांनी सेंद्रिय खत निर्मितीबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) अजय दिघे यांनी केले. दिनेश क्षीरसागर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी काका अडसुळे, रेश्मा राऊत, योगेश बोडके, महेश ढवळे व कृषी विज्ञान केंद्राचे सुयोग ठाकरे, तुषार आहिरे, नरेंद्र जाधव, संजय बनसोडे, ज्ञानेश्वर तांदळे, अरुण गांगोडे यांनी सहकार्य केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search