Next
अरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड
BOI
Friday, December 07, 2018 | 05:17 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी जिल्हा न्यायालयात निवड झालेल्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या विद्यार्थ्यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने सत्कार केला.

रत्नागिरी :
मुंबई उच्च न्यायालयामार्फत जिल्हा न्यायालयासाठी घेतलेल्या कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदांच्या भरतीमध्ये अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांचा सात डिसेंबर २०१८ रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.

१३० कनिष्ठ लिपिक व ७० शिपाई एवढी पदे रिक्त असल्याचे घोषित झाले होते. एकूण ८९२१ पदांसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सर्व प्रवेशफेऱ्या पार करून अंतिम निवड झालेल्यांमध्ये अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. (निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे शेवटी दिली आहेत.)

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीच्या १४ विद्यार्थ्यांची कनिष्ठ लिपिक पदासाठी, तर सहा विद्यार्थ्यांची शिपाई पदासाठी निवड झाली. १० विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत नियमित वर्ग केले. उर्वरित विद्यार्थी मुलाखत टप्प्यांसाठी अकादमीच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष बबनराव पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, अकादमीच्या अध्यक्षा अॅड. प्राची जोशी, सहकार्यवाह नथुराम देवळेकर, सल्लागार मंडळ अध्यक्ष सुदेश प्रसादे, सदस्य उदय लोध, मनोज पाटणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रभारी समन्वयक किरण धांडोरे, ग्रंथपाल मनाली साळवी उपस्थित होत्या. या वेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ‘संस्थेला विसरू नका,’ असे आवाहन बबनराव पटवर्धन यांनी केले. तसेच अॅड. प्राची जोशी यांनी ‘अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या,’ असे आवाहन केले.

लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी व मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली होती. बहुपर्यायी लेखी परीक्षांचे मार्गदर्शन अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमार्फत नियमित वर्गांमध्ये देण्यात आले. परंतु मुलाखत चांगली देता यावी, यासाठी मार्गदर्शन व मुलाखतीचा सराव याकरिता अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सराव मुलाखती कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याच्या पहिल्या फेरीत वैयक्तिक मुलाखतीची तयारी, बायोडेटा व सामान्य ज्ञानावरील प्रश्नांची तयारी, देहबोली, संवाद कौशल्य व मुलाखतींबाबतचे नियम याबाबत अकादमीच्या समन्वयक अॅड. इंदुमती मलुष्टे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. विजय नरसाळे व प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी ६० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या व त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतीचे विश्लेषण करून उपयुक्त सूचना दिल्या.

दुसऱ्या फेरीत अॅड. मलुष्टे यांनी उमेदवारांना न्यायालयांची रचना, कार्यपद्धती, विविध न्यायालयीन संज्ञा याबाबत माहिती दिली. रमेश कोरे, प्रशांत जगताप, विजया कोरे, तेजस पाटील, अॅड. पद्माकर जोशी, डॉ. आर. एच. कांबळे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखातीचे बारकाईने विश्लेषण करून सुधारणेसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. 

या उपक्रमाला कोकणातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुलाखतीचे तांत्रिक प्रशिक्षण मिळाल्याने व सराव केल्यामुळे मुलाखतीविषयी असलेली भीती दूर झाली, तयारी करण्यासाठी दिशा मिळाली व आत्मविश्वास वाढला, असे या वेळी रूपेश गुरव, सुमेध कोसले आदिती बने आदी उमेदवारांनी सांगितले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा व पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

निवड झालेल्या उमेदवारांची नावे : अश्विनी गवळी, आदिती बने, स्वप्नाली गीते, चारुशीला राऊळ, विजय उदाळे, पराग जाधव, प्राजक्ता भाटकर, सायली शेट्ये, मुबाशिर काझी, शिवानी भोंगले, ओंकार नेवरेकर, भक्ती चव्हाण, कविता पड्यार, ज्ञानेश्वर मुरकुटे, रूपेश गुरव, वेदिका निमकर, सुमेध कोसले, स्वप्नाली शिंदे, हर्षद रावणांक आणि रंजिता बंडीवडार.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link