Next
बोरगावची ‘गुगल गर्ल’
BOI
Tuesday, November 14 | 06:28 PM
15 0 0
Share this story

बोरगावची गुगल गर्ल - ईश्वरीपंढरपूर : लहान मुलांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती यांना लहानपणीच खतपाणी घातले, तर ती उत्तम प्रकारे विकसित होऊ शकते. याची उदाहरणे तशी दुर्मीळ असली, तरी कुठे ना कुठे तरी आपण त्याबद्दल ऐकत असतो किंवा प्रत्यक्षही पाहत असतो. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या बोरगावमध्ये राहणारी ईश्वरी म्हणजे तसेच एक दुर्मीळ उदाहरण. साडेपाच वर्षांच्या ईश्वरीची स्मरणशक्ती अत्यंत चांगली असून, या वयातच ती जगभरातील महत्त्वाचे देश, राज्यांच्या राजधान्या, इतिहासातील काही महत्त्वाच्या तारखा अशा अनेक गोष्टी घडाघडा सांगते, जणू काही ‘गुगल सर्च इंजिन’वर सर्च केल्यानंतर गुगलच आपल्याला काही माहिती सांगत आहे. त्यामुळे ‘बोरगावची गुगल गर्ल’ अशी ओळख तिला मिळाली आहे.  

आई-वडिलांसह ईश्वरीविनोद आणि मोनाली गाढवे या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची ईश्वरी ही कन्या. ‘ती तीन वर्षांची असताना माझा मोबाइल क्रमांक तिने पाठ केला असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच काही गोष्टींची उजळणी ती आपोआप करत असल्याचे दिसून आले. आम्हाला आश्चर्य वाटले. म्हणून नंतर तालुका, जिल्हा, राज्याशी निगडित काही गोष्टी तिला सांगितल्या. त्या तिने लगोलग पाठ केल्या. त्यामुळे नंतर देशभरातल्या गोष्टीही सांगितल्या. त्याही तिने पाठ केल्या,’ असे ईश्वरीच्या वडिलांनी सांगितले. आजच्या घडीला ईश्वरी जगभरातील आणि स्थानिक इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान आदींशी संबंधित सुमारे चारशे प्रश्नांची उत्तरे सहजपणे देते. कारण तिची स्मरणशक्ती आणि पाठांतर करण्याची क्षमता तिच्या वयाच्या अन्य मुला-मुलींच्या तुलनेत चांगली आहे. ती काय पाठ करते आहे, याचा पूर्ण अर्थ कदाचित तिला आत्ता कळत नसेल; पण पुढच्या आयुष्यातल्या अभ्यासासाठी तिला या क्षमतेचा उपयोग होईल, यात शंकाच नाही.

कराटे गर्लईश्वरीने बुद्धिबळ, मैदानी कुस्ती आणि कराटे यांमध्येही विशेष प्रावीण्य मिळविले आहे. यात्रेच्या मैदानात ईश्वरी चांगल्या प्रकारे कुस्ती खेळते. कुस्तीमध्ये ती तालुका स्तरावर गाजली आहे. कराटेमध्ये १४ वर्षांच्या आतील वयाच्या गटात तिने सुवर्णपदक मिळवले असल्याचे तिचे वडील विनोद यांनी सांगितले. तिचे वजन केवळ पंधरा ते सोळा किलो आहे. या वजनाच्या गटात ती केवळ दहा सेकंदांतच पट काढून कुस्ती निकाली काढते. कुस्तीचा वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला असून, तेच तिला मार्गदर्शनही करतात. तिचे वडील गावोगावच्या यात्रेत मैदानी कुस्त्या करीत होते. या कुस्त्या पाहूनच ईश्वरीला कुस्तीची आवड लागली. वडिलांनी तिला आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपटही दाखवला. त्यामुळे तिचा कुस्तीबद्दलचा आत्मविश्वास वाढला. आजतागायत ईश्वरी कुस्तीत हरली नसल्याचे सांगितले. एखादवेळी लवकर डाव झाला नाही आणि प्रतिस्पर्धी लवकर पडला नाही, तर दुसऱ्या डावात ती त्याला दमवून विजय मिळवते, असेही त्यांनी सांगितले. ईश्वरी दररोज व्यायाम करते. कुस्ती, कराटेचे प्रशिक्षण घेते आणि अभ्यास-पाठांतरही करते. 

सध्या ईश्वरी बोरगावच्या इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘सीनिअर केजी’मध्ये शिकत आहे. अर्थात, पुढच्या वर्गांत बसण्याची तिची बौद्धिक क्षमता असल्याचे दिसून येत नाही. मुंबईतील एका वैद्यकीय तज्ज्ञांकडे तिची तपासणी केली असता, १० हजारांमागे केवळ २५ ते ३० मुले एवढी बुद्धिमान असल्याचे त्या तज्ज्ञांनी सांगितल्याचे ईश्वरीच्या वडिलांनी सांगितले.  

तिची क्षमता ओळखून लहान वयातच तिच्या आई-वडिलांनी तिला त्या पद्धतीने शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्यांना चांगले वातावरण उपलब्ध करून दिले. त्यामुळे तिची प्रगती होऊ लागली आहे; मात्र तिच्यावर ओझे होतील एवढ्या अपेक्षा नकोत आणि तिनेही ओझे न बाळगता पुढील आयुष्यात स्वच्छंदपणे वाटचाल करावी, अशा सदिच्छा!

(ईश्वरीच्या पाठांतराची आणि स्मरणशक्तीची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Deshpande About
Eshwari is indeed an amazing girl with an amazing memory. All the best to her. She will need proper guidance and training to develop her intellect, understanding and memory on a continuing basis. Hope her teachers and the society at large help her financially and support morally!
2
0
smg About
very brelliant girl
1
0
Sachin karade About
Mast
2
0
Naikaware sir About
very clever girl
1
1

Select Language
Share Link