Next
आसाममधील सत्रिय नृत्यप्रकाराचे पुण्यात सहा जुलैला सादरीकरण
प्रेस रिलीज
Friday, July 05, 2019 | 02:48 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : ‘डिपार्टमेंट ऑफ कल्चरल अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ आसाम आणि पुण्यातील आसोमी यांच्या वतीने ‘स्त्रिजनिर नृत्य  अर्घ्य’ या स्त्रिजनी भस्व महंता यांच्या सत्रिय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, सहा जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सेनापती बापट रस्त्याजवळील भारतीय विद्या भवन येथे होणार आहे. आसाममधील लोकप्रिय सत्रिय शास्त्रीय नृत्यप्रकार अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे,’ अशी माहिती ‘आसोमी’च्या कल्चरल सेक्रेटरी डॉ. देविका बोरठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी ‘आसोमी’च्या जॉइंट कल्चरल सेक्रेटरी बिशिमता दत्ता उपस्थित होत्या. कार्यक्रमात नृत्यांगना स्त्रिजनी भस्व महंता आणि अभ्यासक सत्रिय नृत्यातील विविधता उलगडून दाखविणार आहेत. हरी सायकिया, देबजीत सायकिया, बर्नाली शर्मा, नित्या नंदा डेका, द्विपेन्द्र शर्मा, प्रसन्न बारुआ, परमनंदा काकोती हे साथसंगत करणार आहेत. दीपंकर दत्ता, मोजिंल हजारिका, देबजीत दत्ता हे देखील सादरीकरण करणार आहेत.  अंकीय नाट या प्रकारामध्ये गायन, नृत्य, नाटिकेद्वारे सत्रिय नृत्यातील बारकावे उलगडणार आहेत. 

या विषयी बोलताना डॉ. बोरठाकूर म्हणाल्या, ‘सत्रिय नृत्याला ५०० वर्षे जुनी परंपरा आहे. हे नृत्य आसामधील वैष्णव मठांमध्ये सत्रा नावाने ओळखले जाते. ब्रह्मचारी अभ्यासकांद्वारे याचा पौराणिक नृत्य नाटक स्वरूपात अभ्यास केला गेला. हे नृत्य नाटक मुख्यत्वे आसामाचे वैष्णव संत व समाजसुधारक श्रीमनता शंकरदेव आणि त्यांचे मुख्य शिष्य माधवदेव यांनी १६व्या शतकात लिहिले आहे.’ 

‘हे नृत्य सर्वप्रथम पुरुषांद्वारे प्रदर्शित केले गेले होते; परंतु सध्या महिला नृत्यांगनादेखील याचे सादरीकरण करतात. संगीत नाटक अकादमीने २००८ साली सत्रिय नृत्याला शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली. या नृत्याचा मुख्य देव हा नटवर आहे. यामध्ये प्रामुख्याने रामायण, महाभारतातील कथा नृत्य-नाट्य रूपात सादर केली जाते. पुण्यामध्येदेखील अनेक मुली हा नृत्यप्रकार शिकत असून, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्ट येथे याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे,’ अशी माहिती डॉ. बोरठाकूर यांनी दिली. 


कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, सहा जुलै २०१९ 
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता 
स्थळ : भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search