Next
दादासाहेब फाळके यांच्या स्मृतींना अभिवादन
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 03:50 PM
15 0 0
Share this story

यशवंतराव उद्यानात चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या  नावाने उभारलेल्या फोर-डी थिएटरच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजी उपमहापौर आबा बागुल. शेजारी ज्योती आरवेन, रजिया बल्लारी, पवार, सतीश कांबळे, जयकुमार ठोबरे, अमित बागुल आदी.

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक महर्षी दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट तीन मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. या महान चित्रमहर्षीची कीर्ती आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी शिवदर्शन येथील यशवंतराव चव्हाण उद्यानात चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेल्या फोर-डी थिएटरच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेल्या या फोर-डी थिएटरच्या उद्घाटनाला पाच वर्षांपूर्वी जेष्ठ सिने अभिनेत्री शर्मिला टागोर, जेष्ठ दिग्दर्शक सुभाष घई व प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित राहिले होते. या वेळी ज्योती आरवेन, रजिया बल्लारी, पवार, सतीश कांबळे, जयकुमार ठोबरे, अमित बागुल, द. स. पोळेकर, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, गोरख मरळ, विश्वास दिघे, प्रकाश आरवेन आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link