Next
गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांचा ‘पिफ’मध्ये विशेष सन्मान
अभिनेत्री तबू हिची ‘पिफ’मध्ये खास उपस्थिती.
BOI
Tuesday, January 08, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

पुरस्कारांची घोषणा करताना डॉ. जब्बार पटेल व रवी गुप्ता.

पुणे : ‘भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या गोविंद निहलानी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे,तर प्रसिद्ध संगीतकर रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे’, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

गोविंद निहलानी
‘‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे हे १७ वे वर्ष आहे. येत्या गुरूवारी, दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृहात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून, या वेळी गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांना वरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री तबू हिची यंदाच्या ‘पिफ’मध्ये खास उपस्थिती असणार आहे,’ अशी माहितीही डॉ. पटेल यांनी दिली.

दिलीप प्रभावळकर
‘महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तबू ‘अंधाधुन’ या आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी सिटीप्राईड कोथरूड येथे उपस्थित राहणार आहे, तर १२ जानेवारीला ‘अंधाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासह तबू सिटीप्राईड कोथरूड चित्रपटगृहाच्या मागील बाजूस भरवल्या जाणाऱ्या ‘पिफ फोरम’ला भेट देणार आहे’, असेही त्यांनी नमूद केले. 

संगीतकार रामलक्ष्मण

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search