Next
चार मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, March 01 | 01:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘अबिसारा समाजसेवी संस्थाफ या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने ‘सामाजिक कार्यकर्ता संपर्क कोष’ नोंदणीचे काम सुरू आहे. या नोंदणी अंतर्गत सामाजिक कार्यात रुची असणारे, समाज विकासात हातभार लावण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांना सहभागी होता येणार आहे,’ अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष छाया भोसले-ससाणे (एम.एस.डब्ल्यू) यांनी पत्रकाद्वारे दिली.

‘पुणे आणि परिसरात राहणार्‍या आणि विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्याची ओळख व्हावी, आदान प्रदान व्हावे आणि जनतेला एकत्रितपणे माहिती व्हावी, यासाठी हा कार्यकर्ता संपर्क कोष ऑनलाईन आणि छापील स्वरूपात प्रसिद्ध केला जाणार आहे’, असे छाया भोसले-ससाणे यांनी सांगितले.

‘सामाजिक कार्यात रुची असणार्‍या व्यक्ती, विद्यार्थी, गृहिणींनी चार मार्च २०१८पर्यंत संपर्क साधावा,’ असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क : छाया भोसले- ससाणे (एमएसडब्ल्यू) ९५९४९ ५३११२
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link