Next
माहेश्वरी समाजाच्या धनुर्मास उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
मकर संक्रातीला १५ जानेवारी रोजी उत्सवाची सांगता
प्रेस रिलीज
Monday, January 14, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘माहेश्वरी समाजातर्फे आयोजित धनुर्मास उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उत्सवाला १७ डिसेंबर २०१८ पासून प्रारंभ झाला असून, मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०१९ रोजी सांगता होणार आहे,’ अशी माहिती माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगीरथ राठी यांनी पत्रकाद्वारे दिली.

महिनाभर सुरू असलेला हा उत्सव नारायण पेठेतील श्री बालाजी मंदिर ट्रस्ट येथे होत आहे. यामध्ये माहेश्वरी समाजातील पुरुष, महिला भक्तगण, सभासद, मान्यवर मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत. उत्सवाच्या ३० व्या दिवशी मकरसंक्रांतीला रंगनाथ देव आणि श्रीगोंदबाजी यांच्या विवाह महोत्सवाने उत्सवाची सांगता होते.

गेले महिनाभर सुरू असलेल्या या उत्सवात प्रभात फेरी, अनुष्ठान, भजन, कीर्तन यांचा समावेश आहे. तुळशीपत्र, सुंठ, खीर (दूध, तांदूळ आणि साखर मिश्रित), खिचडी, फुलोरा आदी पदार्थांचे या मासात प्रसाद स्वरूपात सेवन केले जात आहे. गोदा, गीतावली, वेदपाठ, अर्चनावली अशा धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते.

या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना राठी म्हणाले, ‘या उत्सवाला श्रीगोदंबाजी उत्सवानेदेखील ओळखले जाते. या धनुर्मास उत्सवात रंगनाथ देव आणि श्रीगोदंबाजी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो त्या महिन्याला ‘धनुर्मास’ म्हणतात. माहेश्वरी समाजाच्या सर्व मठात, मंदिरात श्रद्धेने हा उत्सव साजरा होतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search