Next
गंगवाल परिवारातर्फे पुण्यात ‘बर्ड फिडर’
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 04:02 PM
15 0 0
Share this article:

पुणे : शहरातील डॉ. कल्याण गंगवाल परिवारातर्फे भगवान महावीर जयंतीनिमित्ताने पुणे आणि परिसरात मोफत एक हजार आठ बर्ड फिडर व १०८ बर्ड नेस्ट (पक्ष्यांची कृत्रिम घरटी) लावण्यात येणार आहेत. 

या उपक्रमात डॉ. गंगवाल यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. चंद्रकला, मुलगे डॉ. पारितोष व डॉ. आनंद, स्नुषा डॉ. सीमा व लिशा, नातवंडे तेजस्विनी, सिद्धार्थ व विहान यांच्यासह सर्व कुटुंब सहभागी झाले आहे. ज्या नागरिकांना बर्ड फिडर हवे आहेत, त्यांना सवलतीच्या दरात डॉ. गंगवाल यांच्या क्लिनिकमधून ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत. १५० रुपयांचे हे बर्ड फिडर १०० रुपयांत मिळणार आहे. 

या विषयी बोलताना डॉ. गंगवाल म्हणाले, ‘भगवान महावीरांनी नेहमी अहिंसा आणि जीवदयेचा संदेश दिला. त्यांच्या संदेशाला पुढे नेण्यासाठी जीवदयेचा उपक्रम हाती घेतला आहे. एक हजार आठ बर्ड फिडर व १०८ बर्ड नेस्ट पुणे आणि परिसरात लावणार आहोत. अहिंसा, जीवदया आणि शाकाहार या गोष्टींवर आम्ही गेली अनेक वर्षे काम करीत आहोत.’ 

बर्ड फिडर घेण्यासाठी पत्ता : गंगवाल क्लिनिक, ५८६ सदाशिव पेठ, उंबऱ्या गणपती चौक, लक्ष्मी रस्ता, पुणे.
संपर्क : डॉ. गंगवाल- ९८२३० १७३४३, सुनील परदेशी- ९८२३२ ०९१८४.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search