Next
रंगूनवाला दंत महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांवर दंतोपचार
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 01:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेसतर्फे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पुणे कॅम्प येथे दंतोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ४०० वारकऱ्यांवर दंतोपचार करण्यात आले.

महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने औषधे पुरविण्यात आली. या वेळी ए. आर. शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. रेणुका गराळे, डॉ. बी. आर. पेंढारकर यांच्यासह तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. आळंदी ते सासवड या वारी मार्गावर या दंत महाविद्यालयाची टीम कार्यरत होती. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search