पुणे : बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपनीने युलिप योजनांमध्ये रिटर्न ऑफ मोर्टलिटी चार्जेस (आरओएमसी) आणि रिटर्न एन्हान्सर ही दोन नवी वैशिष्ट्ये दाखल केली आहेत. यामुळे ग्राहकांसाटी विमा योजनेची परिपक्वता रक्कम (मॅच्युरिटी कॉर्पस) लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. ही वैशिष्ट्ये ग्राहकांना कंपनीची उत्पादने निवडल्यानंतर त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सक्षमता प्रदान करण्याच्या तत्वाशी सुसंगत आहेत.
नवे उत्पादन आणि युलिपच्या अभिनव वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चौघ म्हणाले, ‘एक कंपनी या नात्याने आम्ही ग्राहकांसाठी त्यांचे जीवन ध्येय मिळवून देणारे बनण्यासाठी आमचे स्वरूप बदलवत आहोत. आमच्याकडे मजबूत आणि सातत्यपूर्ण फंड कामगिरीचा इतिहास आहे आणि ग्राहकांपर्यंत त्यांचा फायदा पोहोचवण्यासाठी आमच्या युलिपची पुनर्रचना करणे व त्यात नाविन्य आणणे महत्त्वाचे होते. कंपनीने ही वैशिष्ट्ये पहिल्यांदा बजाज अलियान्झ लाइफ गोल अश्युअरसोबत दाखल केली होती, आता ती बजाज अलियान्झ लाइफ गोल बेस्ड सेव्हिंग्जमध्ये परत आणली आहेत. आरओएमसी आणि रिटर्न एनहान्सरसारखी वैशिष्ट्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच दाखल केल्यानंतर आमचे युलिप अधिक आकर्षक आणि ग्राहकांसाठी मजबूत मूल्य देणारे झाले आहेत.’