Next
राहिलेले सामान देण्यासाठी उबरचालक मुंबईत
प्रेस रिलीज
Tuesday, February 06 | 04:31 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रवासी मोहनीश राजन आपले पारपत्र (पासपोर्ट) व अन्य महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग गाडीतच विसरून गेल्याचे पुणेस्थित उबरचालक भागीदार माणिक चौरे यांना लक्षात येताच त्यांनी राजन यांना तसे कळवले.

मोहनीश राजन हे माणिक यांच्या गाडीतून सॅलिसबरी पार्क येथून पिंपरीपर्यंत आले. तेथून पुढे राजन आपल्या कुटुंबियांसोबत होते. ते लोणावळ्याला पोहोचताच, त्यांची एक बॅग माणिक यांच्या गाडीतच राहिल्याचा माणिक यांचा फोन आला. राजन यांना मेलबर्नचे विमान मुंबईहून घ्यायचे होते. त्यासाठी सोबत आणलेले पारपत्र व अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची आपली तिसरी बॅग आपण गाडीत विसरलो, हे त्यांच्या लक्षात आले.

राजन यांना मेलबर्नसाठी विमान पकडायचे असल्याने ती बॅग मुंबई विमानतळावर आणून पोहोचवण्याची विनंती राजन यांनी माणिकना केली. त्यानंतर जराही वेळ न दवडता माणिक यांनी पुण्याहून मुंबईकडे प्रवास सुरू केला. ते मुंबई विमानतळावर वेळत पोहोचल्यामुळे राजन यांना विमान वेळवर गाठता आले.

याबाबत बोलताना उबरचे प्रवक्ता म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना उबरचा अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आमच्या चालक भागीदारांनी घेतलेले कष्ट आणि त्यांचे प्रसंगावधान याबाबत आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपल्या रोजच्या कामाव्यतिरिक्त, खूप पुढे जाऊन, त्या प्रवाश्यांची बॅग नियोजित स्थळी पोहोचवून माणिक यांनी केलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. असे प्रामाणिक लोक आमच्यासोबत काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link