Next
‘डब्ल्यूआरआय इंडिया’तर्फे विजेत्यांची घोषणा
प्रेस रिलीज
Tuesday, July 24, 2018 | 05:10 PM
15 0 0
Share this story

‘बेटर बस चॅलेंज’मधील विजेत्यांसह मान्यवर

मुंबई : डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सिटीजतर्फे एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन आणि फेडेक्स कॉर्पची उपकंपनी असलेल्या फेडेक्स एक्स्प्रेस यांच्या सहकार्याने ‘बेटर बस चॅलेंज’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या तीन विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. भारतातील सार्वजनिक बस यंत्रणेमध्ये नाविन्य आणण्यासाठी आयोजित केली ही खुली स्पर्धा वर्षाच्या सुरुवातीला घेण्यात आली.

‘बेटर बस चॅलेंज’ या स्पर्धेच्या पहिल्या वर्षीच बस उत्पादक, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक, तंत्रज्ञान व सेवा पुरवठादार, दळणवळण उद्योजक आणि अशासकीय संस्थांकडून (एनजीओ) भरघोस प्रतिसाद लाभला.

‘डब्ल्यूआरआय इंडिया’चे संचालक माधव पै यांनी अशा प्रकारच्या स्पर्धेची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘या स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या माध्यमातून संशोधक आणि दळणवळण एजन्सींना देशभरातील शहर बस सेवा अत्याधुनिक करण्यासाठीच्या उपाययोजना विकसित करण्यासाठी एका व्यासपीठावर आणण्याची क्षमता सिद्ध झाली. पुढील वर्षभर विजेत्या कंपन्या ट्रान्झिट एजन्सींसोबत काम करतील. पथदर्शी शहरांच्या गरजांनुसार उपाययोजना आखण्यात येतील आणि क्षमता, उपलब्धता व प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांच्या उपाययोजनेतील क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवतील.’

विजेत्या उपाययोजना तीन मुख्य समस्यांचे निराकरण करतात. यात संचलन क्षमतेत सुधारणा करण्यासाठीची साधने व सेवा, प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा आणि इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्यासाठीच्या यंत्रणांचा समावेश आहे.

गेल्या सहा आठवड्यांमध्ये विजेत्यांना काटेकोर मूल्यमापन प्रक्रियेतून जावे लागले. या मूल्यमापनाचा भाग म्हणून या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड करून ‘बेटर बस कोहोर्ट’ स्थापन केला. हा ‘कोहोर्ट’ त्यानंतर बंगळुरूमध्ये आयोजित चार दिवसांच्या अॅक्सिलरेटर प्रोग्रॅममध्ये सहभागी झाला. त्यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजना अधिक विकसित करून भारतीय शहरांच्या गरजांची पूर्तता करण्यासारख्या व्हाव्यात या दृष्टीने त्या उपाययोजनांच्या बिझनेस, डिझाइन, मार्केटिंग, फायनान्स आणि गुंतवणूक या पैलूंबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

‘बेटर बस कोहोर्ट’ने सादर केलेल्या प्रस्तावांचे परीक्षण परीक्षकांच्या पॅनलने केले आणि तीन विजेत्या उपाययोजनांची निवड केली. त्यात या उपाययोजनांचा समावेश होता. सिटी फ्लो हे ऑन डिमांड अॅग्रीगेटर (संकेतस्थळ वा प्रोग्रॅम) आहे. यात ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशनमधून शहरातील वातानुकूलित बसमधील आसन वाजवी दराने आरक्षित करू शकतात. गर्दीच्या वेळी सार्वजनिक बस सेवेत सुधारणा आणि आरामदायीपणा देण्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यावर कंपनीतर्फे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
 
सेल प्रोपल्शन हे स्वत: विकसित केलेले ट्रेन तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सध्या अस्तित्वात असलेल्या बसमध्ये बसवून त्यांना पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर परिवर्तीत करता येऊ शकते. एआरएआय प्रमाणित इलेक्ट्रिक कन्व्हर्जन कीट्स या कोणत्याही बस देखभालीच्या कारखान्यामध्ये बसविता येऊ शकते.
 
स्मॉल स्पार्क कन्सेप्ट्सनी सादर केले आहे माफिया. या उत्पादनासाठी पेटंटची नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या उत्पादनामुळे बसमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाची पातळी कमी होते आणि बसची ज्वलनक्षमता (कम्बशन एफिशिअन्सी) सुधारते. हे उत्पादन बसमध्ये बसविले असता इंधनाची गरज आणि टेलपाइपमधून होणारे उत्सर्जन कमी होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link