Next
कर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर
BOI
Tuesday, June 11, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this article:

आकांक्षा कदमरत्नागिरी : कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला जाहीर झाला आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या १६१व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात साहित्यिक डॉ. परीक्षित शेवडे यांच्या हस्ते २३ जून २०१९ रोजी दुपारी तीन वाजता पुरस्कार प्रदान केला जाईल. हा कार्यक्रम शहरातील झाडगाव येथील कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे.

याच कार्यक्रमात डॉ. शेवडे यांचे ‘पाकिस्तान- विनाशाकडून विनाशाकडे’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या केले जाणार असून, कर्‍हाडे ज्ञातीतील विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या निमंत्रित जोडप्यांचे सत्कारही केले जाणार आहेत.

आकांक्षाने आतापर्यंत विविध कॅरम स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. ऑल मिरकरवाडा रायझिंग स्टार कॅरम क्लब व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे आयोजित कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक, राधाकृष्ण मंदिर संस्था आयोजित स्पर्धेत प्रथम, जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा प्रथम क्रमांक, सावंतवाडी येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१७-१८मध्ये धारावी (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड होऊन तिने कांस्यपदक पटकावले आहे. तामिळनाडू (मदुराई) येथे राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. 

वाराणसी उत्तरप्रदेश येथे उत्तरप्रदेश कॅरम असोसिएशनतर्फे सब ज्युनियर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक, तामिळनाडू येथे राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत रौप्यपदक, नागपूर येथे ४६व्या ज्युनियर नॅशनल व इंटरस्टेट कॅरम चॅम्पियन स्पर्धेत ज्युनियर गटात कांस्यपदक अशी पदकांची कमाई केली आहे. राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे दादरमध्ये राष्ट्रीय कॅरम स्पर्धा कांस्यपदक मिळवले. कुडाळ, डेरवण, जाकिमिर्‍या, नायगाव येथील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचा सत्कार करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : २३ जून २०१९
वेळ : दुपारी तीन वाजता 
स्थळ :  कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे राणी लक्ष्मीबाई सभागृह, झाडगाव, रत्नागिरी.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
J V Sangam About 66 Days ago
Very nice 💓 hearty congratulations to Akanksha Kadam for Felicitation by Karhade Brahmin Sangh
0
0
Deepak S.Berde About 66 Days ago
अभिनंदन!
0
0
S S Ambekar About 67 Days ago
Abhinandan Badhai Congratulations
0
0

Select Language
Share Link
 
Search