Next
डॉ. कल्याण गंगवाल यांना आचार्य विद्यासागर संयम पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, March 29 | 01:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : दिगंबर जैन आचार्य १०८ विद्यासागरजी यांच्या ५०व्या संयम वर्षानिमित्त दिला जाणारा ‘आचार्य विद्यासागर संयम पुरस्कार’, पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि ‘सर्व जीव मंगल प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. 

‘महावीर मेडिकल फाउंडेशन’, ‘विश्व जैन डॉक्टर्स फोरम’ व ‘विद्यासागर संयम वर्ष समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. आचार्य विद्यासागर कीर्तिस्तंभ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची रक्कम डॉ. गंगवाल यांनी ‘आचार्य विद्यासागर जीवदया प्रतिष्ठान’ला दिली.

डॉ. कल्याण गंगवालअत्यंत उच्चशिक्षित, संयमी व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. डॉ. कल्याण गंगवाल यांनी गेल्या १५ वर्षांपासून ब्रह्मचर्य पाळले आहे. दिवसातून एकदा भोजन घेणे, सूर्यास्तानंतर पाण्याचाही त्याग करणे आणि जीवदया, अहिंसा, शाकाहार या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेल्या कार्याचे योगदान लक्षात घेऊन, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

पुरस्काराबद्दल डॉ. गंगवाल म्हणाले, ‘महान आचार्य विद्यासागरजी यांच्या संयम वर्षानिमित्त मिळालेला हा सन्मान माझ्या व्यक्तिगत जीवनात संयम व अध्यात्मिकता वाढीस पूरक ठरेल.’

औरंगाबाद येथील चंद्रसागर सभागृहात दिगंबर जैन संत १०८ आगाम सागरजी, मुनी सहजसागरजी, मुनी पुनीतसागरजी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विद्यासागर संयम वर्ष समितीचे अध्यक्ष व मुंबईतील उद्योजक प्रभातजी जैन, महावीर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील सावजी, विश्व जैन डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. सन्मती ठोले, उद्योगपती डी. बी. पहाडे, सकल जैन समाजाचे अध्यक्ष देवेंद्र काला, महासचिव महावीर पाटणी, डॉ. शैलेश चांदीवाल, डॉ. प्रकाश पाटणी, डॉ. ईश्वर ललवाणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link