Next
पुण्यातील डॉ. सुमित शाह यांना राष्ट्रीय पुरस्कार
BOI
Friday, August 02, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

डॉ. सुमित शाह यांना आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व डॉ. जे. के. सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे : पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमित शाह यांना ‘प्रॉमिसिंग सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट ऑफ द इयर-२०१९’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या ‘ग्लोबल हेल्थकेअर एक्सलन्स अॅवॉर्डस् अँड समिट’ या कार्यक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व पद्मश्री डॉ. जे. के. सिंग यांच्या हस्ते शाह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. शाह यांना कर्करोग उपचार क्षेत्रातील १२ वर्षांचा अनुभव असून, गेली पाच वर्षे ते पुण्यात कार्यरत आहेत. कर्करोगाविषयी जनजागृती, तसेच तंबाखू व्यसनमुक्तीविषयी व्याख्याने देण्याबरोबरच मागील पाच वर्षांपासून ते तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मोफत तपासणी करत आहेत. रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान कमी जखम व्हावी, तसेच जखम लवकर भरून निघावी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच दुर्गम भागातील अनेक कर्करोग रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केली आहे. त्यांनी ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर’ हे सर्वसमावेशक कर्करोग रुग्णालय सुरू केले असून, कर्करोगाच्या रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

डॉ. शाह म्हणाले, ‘भारतात मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण कर्करोग असून, २०१८ मध्ये भारतातील कर्करुग्णांची संख्या २२ लाख ५० हजार होती. प्रत्येक वर्षी साधारण ११ लाख ५० हजार कर्करोग रुग्णांचे निदान होते, तर सात लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा या आजाराने मृत्यू होतो. कर्करोगाचे कारण प्रामुख्याने तंबाखू असल्याचे आढळते. याशिवाय बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, महिलांमध्ये एचपीव्ही संसर्ग हीदेखील कारणे दिसून येतात. भारतातील बहुतांश रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात किंवा उशीरा समोर येतो ही दु:खद बाब आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search