Next
शुल्कवाढीविरोधात तक्रार करण्याची पालकांना मुभा
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 02:11 PM
15 0 0
Share this story

शिक्षणमंत्री विनोद तावडेमुंबई : शाळांनी केलेल्या भरमसाठ फीवाढी विरोधात २५ टक्के पालकांनी तक्रार केली, तर शुल्क नियंत्रण समिती त्यावर योग्य निर्णय घेईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २० मार्च रोजी विधानसभेत दिली.  आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. 

लक्षवेधीला उत्तर देताना तावडे म्हणाले, ‘शिक्षणाच्या व्यापारीकरणास तसेच, शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) लागू करण्यात आला आहे.’ कायद्यानुसार यात पालकांना दाद मागण्याची मुभा नाही, असे भातखळकर यांनी निदर्शनास आणून दिले व यात बदल करण्याची मागणी केली.

आमदार अतुल भातखळकर‘२५ टक्के पालकांनी तक्रार केल्यास नियंत्रण समितीकडे दाद मागण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येईल. आगामी शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होईल,’ असे तावडे यांनी सांगितले. 

या निर्णयामुळे अवाजवी फी आकारणाऱ्या शिक्षण संस्थांना चाप बसणार असून, पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link