Next
शिवतेज मित्रमंडळातर्फे ‘२६/११’च्या शहीदांना श्रद्धांजली
नागेश शिंदे
Wednesday, November 28 | 02:26 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : मुंबईत झालेल्या ‘२६/११’च्या हल्ल्याला दहा वर्षे झाल्यानिमित्त हिमायतनगर शहरातील शिवतेज मित्रमंडळातर्फे २७ नोव्हेंबर २०१८ रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली. परमेश्वर मंदिरासमोर हा कार्यक्रम झाला. वीर जवानांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘‘२६/११’च्या हल्ल्यात ज्यांनी आपला जीव गमावला व ज्यांनी या हल्ल्यात आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली, त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत,’ अशी भावना शिवतेज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना मोठ्या हिमतीने प्रत्युत्तर देणाऱ्या शूरवीर पोलीस अधिकाऱ्यांनाही सलाम करण्यात आला.



हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, नगरसेवक रामभाऊ ठाकरे, गजानन चायल, विलास वानखेडे, राम नरवाडे, प्रकाश रामदिनवार, नारायण चव्हाण, खंडू चव्हाण, पापादा शिंदे, विपुल दंडेवाड, योगेश चिल्कावार, हिदायद खान पठाण, अनिल नाईक, जयराम शिंदे, शुभम दंडेवाड, नागेश शिंदे, मंगेश शिंदे, आकाश वानखेडे, शुभम हरडपकर, आदर्श हेंदे, हनुमान अरेपल्लू, अरविंद गुंडेवार, अरविंद वानखेडे यांच्यासह शिवतेज मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link