Next
भावार्थ श्रीगुरुचरित्र
BOI
Wednesday, December 19, 2018 | 10:34 AM
15 0 0
Share this article:

आपल्याकडील विविध संप्रदायांत दत्तसंप्रदायाला मोठे महत्त्व आहे. या संप्रदायात श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, जनार्दनस्वामी यांसारखे थोर पुरुष होऊन गेले. अध्यात्म व धर्मरक्षणाचे कार्य त्यांनी केले. ही परंपरा पुढे माणिकप्रभू, अक्कलकोटचे स्वामी आणि टेंबे स्वामी महाराज या दत्तभक्तांनी पुढे चालविली या सर्वांनी दत्त महाराजांची उपासना केली. दत्ताच्या खऱ्या उपासनेबाबत डॉ. सी. ग. वैद्य यांनी ‘भावार्थ गुरुचरित्र’मधून मार्गदर्शन केले आहे. गुरुचरित्राच्या ओवीबद्ध पोथीचे हे गोष्टीरूप गद्यनिवेदन आहे. यातून गुरुमहिम्याची ओळख होते.          

दत्तरूप नृसिंहसरस्वतींचे दर्शन घेण्यासाठी गाणगापूरला निघालेल्या कीर्ती नामकरणी नावाच्या भक्ताच्या प्रवासापासून पहिल्या अध्यायाची सुरुवात होते. वाटेत त्याला साधुपुरुष भेटतो. त्या दोघांच्या संवादातून गुरुचरित्राच्या ५२ अध्यायांमधील गोष्टी यात कथन केल्या आहेत. दुसऱ्या भागात श्रीगुरुचरित्र व श्रीदत्त संप्रदायाबद्दल संक्षिप्त विवेचन केले आहे. यामध्ये गुरुचरित्राचे लेखक, विविध पोथ्यांमधील फरक, गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाची पद्धत, त्याची फलश्रुती, गुरुगीता, गुरुचरित्रातील कानडी पदे, संस्कृत श्लोक व स्तोत्रे, श्रीरंगावधूतस्वामी विरचित दत्तबावनी, दत्तस्थाने आदींची माहिती दिली आहे.  
     
महाराष्ट्रीयांच्या नित्य वाचनात श्रीगुरुचरित्राला महत्त्वाचे स्थान आहे. श्रीगुरुचरित्र हा एक सिद्धमंत्ररूप व महाप्रसादिक ग्रंथ आहे. भक्तिमार्गातील स्वकर्मच्युती हा जो शास्त्रोक्तदोष आहे, तो नाहीसा करून जनतेला स्वकर्माच्या ठिकाणी अभियुक्त करून भक्तिप्रवण करण्यासाठी आणि लोकांच्या मनी त्याग व निर्भयता उत्पन्न करण्यासाठी श्रीगुरुचरित्राचा अवतार आहे. हा ग्रंथ निर्मल अंतःकरणाने वाचला, तर हितकारक ठरतोच; परंतु सप्ताह पद्धतीने वाचला, तर त्वरित फल देतो असा साधकांचा अनुभव आहे.

अंतःकरण असता पवित्र।
सदाकाळ वाचावे श्रीगुरुचरित्र।।

पुस्तक : भावार्थ श्रीगुरुचरित्र
लेखक : डॉ. सीताराम गणेश देसाई
प्रकाशक : पंचतत्त्व प्रकाशन, १/५ शहा बिल्डिंग, डॉ. सीताराम गणेश देसाई मार्ग, माहीम, मुंबई - ४०००१६.
संपर्क : (+९१) ९८२००४५३२४
पाने : २७५
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search