Next
‘एचडीएफसी’चा पाणी फाउंडेशनला हातभार
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 05:41 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘सत्यमेव जयते पाणी चषक २०१८’ स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील दुष्काळग्रस्त खेड्यांसाठी पाणी फाउंडेशनने एक मे २०१८ रोजी श्रमदान करण्याच्या आवाहनास संपूर्ण महाराष्ट्रातील एक लाख तीस हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. एक मे रोजीच्या महा श्रमदानात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या स्वयंसेवकांत भारतात गृहवित्त सहाय्य क्षेत्रातील अग्रगण्य ठरलेल्या एचडीएफसी लिमिटेडच्या स्वयंसेवकांचा समूह सर्वात अधिक होता.

‘एचडीएफसी’च्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक मधील शाखांमधील ३४० कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या कार्याला पाठींबा देणाऱ्यांमध्ये एचडीएफसी आहे. याबद्दल सांगताना ‘एचडीएफसी’चे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत आम्ही दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या कार्याला मदत केली आहे. एका नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी ध्येयाने, निष्ठेने आणि आवड म्हणून कार्य करणाऱ्या या समूहामुळे आम्हाला या प्रकल्पाचे आकर्षण वाटले. आमीर खानच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘सत्यमेव जयते’ या दूरदर्शन कार्यक्रमातून सुरू झालेल्या पाणी व्यवस्थापन उपक्रमाची  संकल्पना अवघ्या दोन वर्षात परिणामकारक अस्तित्वात आली. या वर्षी हा प्रकल्प ७५ तालुक्यातील चार हजार गावांमध्ये राबवला गेला, यातूनच या प्रकल्पाच्या यशाचे मोजमाप स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील पाणी साठवण्यासाठी जनतेच्या चळवळीचा एक भाग बनण्याची चांगली संधी आमच्या ‘एचडीएफसी’च्या कर्मचाऱ्यांना या महा श्रमदानातून लाभली.’  

एचडीएफसी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी सिद्धेश्वर निंबोडी (पुणे जिल्हा), कोनाम्बे (नाशिक जिल्हा), आणि उमथा  (नागपूर जिल्हा) येथे श्रमदान केले. गावकऱ्यांनी केलेले आदरातिथ्य आणि श्रमदानानंतर आग्रहाने वाढलेले जेवण यामुळे ‘एचडीएफसी’च्या कर्मचाऱ्यांना कृतकृत्य वाटले. ‘पाणी चषक २०१७’च्या माध्यमातून एक हजार ३२१ गावांमधून आठ हजार २०० कोटी लिटर्सहून अधिक पाणी साठवण्याची क्षमता वाढली होती. यावर्षी याच प्रकल्पाच्या माध्यमातून तिप्पट काम झाल्यामुळे पाणी साठवण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

‘एच. टी. पारेख फाउंडेशन’विषयी :
एचडीएफसी लिमिटेडने भारतातील सामाजिक आणि विकासाच्या कार्यात मोलाचे दान असलेले संस्थापक एच. टी. पारेख यांच्या स्मृतीसाठी एच. टी. पारेख फाउंडेशन ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था स्थापन केली आहे. भारतातील सामाजिक आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन फाउंडेशन ‘एचडीएफसी’च्या दूरदृष्टीने कार्यशील परिणाम अमलात आणण्याचे ध्येय बाळगून आहे. भारतात सामाजिक क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या संघटनांना फाउंडेशन पाठींबा देण्याचा प्रयत्न करते. शहरी आणि ग्रामीण भागातील दुर्बल जमातींसाठी गरजा लक्षात घेऊन कार्य करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.  

‘एचडीएफसी लिमिटेड’विषयी :
एचडीएफसी लिमिटेड ही भारतातील तारण वित्त सहाय्य क्षेत्रातील अग्रगण्य आणि प्रस्थापित आर्थिक संस्थान आहे. गेल्या चाळीस वर्षांत ६२ लाख ग्राहकांना त्यांचे घर घेण्यासाठी कंपनीने अर्थ साहाय्य केले आहे. भारतभरातील दोन हजार ४०० शहरे आणि नगरे ४७४ कार्यालयांच्या जाळ्यांनी जोडलेली आहेत. अनिवासी भारतीय आणि परदेशस्थ मूळ भारतीयांसाठी एचडीएफसी लिमिटेडची लंडन, दुबई आणि सिंगापूर इथे कार्यालये, तर कुवेत, ओमान, कातर, शारजा, अबू धाबी, आणि सौदी अरेबिया-अल-खोबर, जेद्दा आणि रियाध इथे सेवा केंद्रे आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link