Next
‘शतायुषी दिवाळी अंकाचे कार्य अनुकरणीय’
डॉ. जब्बार पटेल यांचे गौरवोद्गार
BOI
Tuesday, October 30, 2018 | 03:09 PM
15 0 0
Share this story

शतायुषी दिवाळीअंकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) डॉ. राहुल कुलकर्णी,  डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. जब्बार पटेल आणि डॉ. एस. एम. कात्रक.

पुणे : ‘सध्याच्या डिजिटल युगात आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील दैनंदिन गरजेची माहिती, विविध विकाराचे स्वरूप, त्यावरील संशोधन आणि उपाय हे वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहचविण्याचे कार्य शतायुषी दिवाळी अंकाच्या वतीने अव्याहतपणाने सुरु आहे. हा अतिशय अनुकरणीय उपक्रम आहे’, असे गौरवोद्गार नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले. येथील द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चाळीसाव्या शतायुषी दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी डॉ. अरविंद संगमनेरकर, दिवाळी अंकाचे अतिथी संपादक डॉ. राहुल कुलकर्णी आणि जसलोक हॉस्पिटलचे न्युरोफिजिशियन डॉ.एस. एम. कात्रक उपस्थित होते. 

यंदा ‘मेंदू आणि मेंदूचे आजार’ हा दिवाळी अंकाचा मुख्य विषय आहे. या वेळी विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले. त्यामध्ये शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य पुरस्कार - ध्रुव जोशी, शतायुषी सर्वोत्कृष्ट सामाजिक आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण पुरस्कार - डॉ. सुजाता गोडा आणि शतायुषी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार - डॉ. शौनक पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला. लेख स्पर्धेतील विजेत्या राजश्री महाजनी यांना प्रथम आणि मेधा जोग यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.  ‘माझा एक अनुभव’ या स्पर्धेच्या विजेत्या  सुस्मिता देसाई यांना प्रथम आणि संपदा वागळे यांना द्वितीय क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘आज प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्याचा स्वीकार अनिवार्य असला, तरी लहानपणी शाळेत असताना शिक्षकांनी जी संस्काराची शिदोरी दिली आहे. त्याची सतत आठवण ठेवणे गरजेचे आहे आणि त्याच संस्काराच्या शिदोरीवर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा द्यावी’, अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.

डॉ. संगमनेरकर यांनी स्वागत करून शतायुषी दिवाळी अंकाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. राहुल कुलकर्णी आणि डॉ. सुजाता गोडा यांनी मनोगत व्यक्त केले. 

डॉ. कात्रक यांचे स्मरणशक्ती कशी वाढवावी आणि विस्मरण कसे कमी करावे या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link