Next
फडणवीस यांनी घेतली मायकेल ब्लूमबर्ग यांची भेट
प्रेस रिलीज
Friday, June 15, 2018 | 10:44 AM
15 0 0
Share this story

न्यूयॉर्क : दुबई, कॅनडा आणि अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा न्यूयॉर्कचे महापौरपद भूषविलेले दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणजेच मायकेल ब्लूमबर्ग यांची भेट घेतली. ते जागतिक वित्त सेवा कंपनी, जनमाध्यम कंपनी आणि माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या ‘ब्लूमबर्ग एलपी’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी, फेब्रुवारी २०१५मध्ये मुंबईत झालेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेतील ब्लूमबर्गच्या सहभागाविषयीच्या कराराची व्याप्ती वाढविण्यावर चर्चा केली. 

न्यूयॉर्कस्थित ‘ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज’ ह्या संस्थेने, जगभरातील सर्वोत्तम रस्ते सुरक्षा पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी २०१५ साली जगभरातून निवडलेल्या दहा शहरांत मुंबईचा समावेश होता. ह्या निवडीसाठी जगभरातील २० अशा शहरांशी स्पर्धा होती, जेथे रस्ते अपघातात होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यावर खास भर दिला जातो. अशा २० शहरांशी स्पर्धा करून मुंबईने हा मान मिळवला होता. 

ह्या चर्चेदरम्यान फडणवीस आणि ब्लूमबर्ग यांनी ह्या अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. आपल्या  ह्या ट्विटर हँडल वर फडणवीस यांनी लिहिले, की ह्या अभियानात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ह्या अभियानामुळे रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. चर्चेदरम्यान ब्लूमबर्ग यांनी फिनटेक स्टार्ट अप कंपन्यांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 


(To read this news in English, please click here.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link