Next
‘टाटा कॅपिटल’तर्फे ‘अॅक्सेल होम लोन्स’
BOI
Wednesday, September 19 | 04:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (टीसीएचएफएल) या टाटा कॅपिटल लिमिटेडच्या मालकीच्या उपकंपनीने ‘अॅक्सेल होम लोन्स’ या नवीन गृहकर्ज योजनेची घोषणा केली. सणासुदीच्या काळात घराची खरेदी मंगल मानली जात असल्याने, या काळात अधिक मोठी घरे घेण्याची क्षमता ग्राहकांना ‘अॅक्सल होम लोन्स’ योजनेद्वारे मिळेल.

या योजनेची रचना पहिल्या ३६ महिन्यांतील हप्त्यांमध्ये (ईएमआय) केवळ व्याजाचा समावेश असेल आणि त्यानंतर ग्राहक कर्जातील उरलेल्या भागाची परतफेड अशी करण्यात आले आहे. या रचनेचा उद्देश म्हणजे कर्जाच्या सुरुवातीचा काळ ग्राहकासाठी आर्थिकदृष्ट्या जरा सोपा करणे हा आहे. ग्राहकाचे उत्पन्न जसे हळुहळू वाढेल तसा कर्जाचा हप्ताही वाढेल.

या योजनेबद्दल टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कौल म्हणाले, ‘सणासुदीचा काळ आनंद आणि वैभव घेऊन येतो आणि या सणासुदीच्या काळात ग्राहकांना मार्गदर्शन करणारी ‘अॅक्सल होम लोन’ ही योजना आणताना आम्ही खूप रोमांचित झालो आहोत. व्यावसायिक पगारदारांना त्यांच्या उत्पन्नक्षमतेशी सुसंगत असे परवडण्याजोगे गृहकर्ज उत्पादन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गृहकर्जाच्या या स्टेप्ड-अप स्वरूपाच्या उत्पादनामुळे ग्राहक अधिक मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याचे लक्ष्यही ठेऊ शकेल. ग्राहक अधिक मोठे घर घेण्याचा विचारही करू शकतील. वेगाने होणारे शहरीकरण, मोठ्या प्रमाणातील आर्थिक हालचाली, विभक्त कुटुंबांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे भारतात अॅक्सल होम लोन्सच्या वाढीत मदत होईल.’

टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्सची ‘अॅक्सेल होम लोन्स योजना’ ही दोन वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या पगारदार व्यक्तींना डोळ्यापुढे ठेऊन विकसित करण्यात आली आहे. यात ग्राहक तीन कोटी रुपयांपर्यंतची गृहकर्जे ३० वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी घेऊ शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link