Next
शेतकऱ्यांसाठी ‘स्वराज ट्रॅक्टर्स’तर्फे ‘मेरा स्वराज अॅप’
प्रेस रिलीज
Saturday, August 18 | 11:55 AM
15 0 0
Share this story

मोहाली : ‘महिंद्रा ग्रुप’ची उपकंपनी असलेल्या ‘स्वराज डिव्हिजन’च्या वतीने शेतकऱ्यांबरोबरील संपर्क वाढविण्यासाठी ‘मेरा स्वराज अॅप’ हे नवीन अॅप दाखल केले आहे. या मोबाईल अॅप्लिकेशनमुळे स्वराज्य ट्रॅक्टर्सद्वारे शेतकऱ्यांना आता अधिक सेवा पुरवली जाणार आहे. त्यामध्ये ‘डोअर स्टेप सर्व्हिस’, ‘स्टॅंड बाय ट्रॅक्टर्स’ , ‘फिक्स्ड डे फिक्स लोकेशन सर्व्हिस इव्हेंटस्’ आदींचा समावेश आहे. हे अॅप दहा भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

या नवीन तंत्रज्ञान उपक्रमामुळे कंपनीच्या ग्राहक नाते व्यवस्थापन क्षमतेला आणखी बळ मिळणार आहे;तसेच हा उपक्रम कंपनीच्या ग्राहकाभिमुख भूमिकेचाही एक भाग आहे.

याबाबत ‘स्वराज’ डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन पोपली म्हणाले, ‘मेरा स्वराज’ या अॅपमुळे देशभरातील ग्राहक आता ‘स्वराज’ ब्रॅंडच्या थेट संपर्कात आले आहेत. आमचे भागीदार असलेल्या वितरकांची विश्वासार्हता आणि सेवेमुळे हे शक्य झाले आहे.  या नवीन मोबाईल अॅपमुळे आम्ही ग्राहकांबरोबरचे आमचे नाते आणखी दृढ करणार आहोत. या अॅपद्वारे ग्राहकवर्ग आता आमची विविध उत्पादने, प्रॉडक्ट्स आणि सेवेचा लाभ घेऊन त्याबद्दल आपले मतही मांडू शकणार आहे. भविष्यात आम्ही या अॅपमध्ये अशा काही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत की, ज्याद्वारे भारतीय शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकांना सर्व सुविधा उपलब्ध होईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link