Next
‘टाटा’ मेन्स्ट्रुएशन हायजिन मॅनेजमेंट उपक्रम सुरू करणार
प्रेस रिलीज
Friday, March 15, 2019 | 01:48 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टाटा ट्रस्ट्स समूहाच्या टाटा वॉटर मिशनअंतर्गत कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र व झारखंड या सात राज्यांमधील ग्रामीण भागांमध्ये मेन्स्ट्रुअल हायजिन मॅनेजमेंट (एमएचएम- मासिक पाळीच्या काळातील आरोग्य व्यवस्थापन) उपक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा टाटा ट्रस्टस समूहाने नुकतीच केली. टाटा ट्रस्ट्स समूहाचे टाटा वॉटर मिशन ग्रामीण भागांमध्ये पिण्यासाठी सुरक्षित, खात्रीशीर व पुरेसे पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढविण्यासाठी २०१५पासून कार्यरत आहे.

याबाबत बोलताना टाटा वॉटर मिशनचे प्रमुख दिव्यांग वाघेला म्हणाले, ‘मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या सवयी पाळल्या जाव्यात यासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा प्राथमिक उद्देश आहे. याबाबत प्रशिक्षण देण्याबरोबरच पर्यावरणस्नेही उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा साखळी निर्माण व्हावी म्हणून आम्ही महिला गट व स्थानिक सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देऊ. मासिक पाळीच्या विषयावर खुलेपणाने व व्यापक चर्चा झाल्यास विस्तृत माहिती, सुरक्षित उत्पादने व पायाभूत सोयीसुविधा प्रदान करण्यासाठी एक मंच बनवण्यात मदत मिळेल. मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे हा सामान्य दृष्टिकोन अवलंबिला जावा यासाठी प्रयत्न करणे व हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.’

मासिक पाळीबद्दल होणाऱ्या चर्चेचा सूर अशुद्धता व लज्जा यांपासून दूर नेऊन एक नैसर्गिक शारीरिक निरोगी प्रक्रिया म्हणून याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असावा यासाठी कुटुंबापासून धोरणकर्त्यांपर्यंत सर्व स्तरांवर इतरांना प्रभावित करणाऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे वाघेला यांनी सांगितले.

टाटा ट्रस्ट्स समूहाचा लोकोपकारी उपक्रम ‘दी फोर्स बियाँड’च्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या वैचारिक पॅनल चर्चांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. महिलांना समान संधी व वातावरण मिळावे हा याचा मुख्य उद्देश होता. या चर्चेदरम्यान महिलांच्या क्षमतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत परिवर्तन घडवून आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करण्यासाठी आशा व प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला गेला.

‘एमएचएम’ची अंमलबजावणी शाळा आणि सामाजिक या दोन स्तरांवर केली जाईल. शाळांमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी चार सत्रांमध्ये स्कूल मोड्यूल्स असतील. विद्यार्थिनी व शिक्षकांना अशाप्रकारे सक्षम केले जाईल की, येत्या काळात त्यांच्याकडून हे कार्यक्रम शाळेत कायम सुरू ठेवले जातील. सामाजिक कार्यक्रमांमध्ये ५५ वर्षे वयापर्यंतच्या महिलांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातील. या व्यतिरिक्त, आठवीपेक्षावरच्या वर्गातील मुलांसाठी प्रजनन चक्र (पुरुष व महिला) यासारख्या विषयांवर जागरूकता निर्माण केली जाईल. यामुळे त्यांच्या कुटुंबातील आई, बहिणी यांच्यासाठी एक सहाय्यक, समर्थक सामाजिक-सांस्कृतिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

टाटा ट्रस्ट्स समूहाकडून सामाजिक व शालेय स्तरावरील कार्यक्रम लागू करण्यासाठी समाजातील लोक व युवा मुलींना प्रशिक्षित केले जाईल जेणेकरून ते कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून काम पाहतील.  टाटा ट्रस्ट्स समूहाने या उपक्रमाला तंत्रज्ञान मदत मिळावी यासाठी सुखीभव, बंगलोर अँड जाटान डिझाइन्स, राजस्थान यासारख्या संघटनांसोबत भागीदारी केली आहे. शाळांमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी ४ सत्रांमध्ये स्कूल मोड्यूल्स असतील, विद्यार्थिनी व शिक्षकांना अशाप्रकारे सक्षम केले जाईल की, येत्या काळात त्यांच्याकडून हे कार्यक्रम शाळेत कायम सुरू ठेवले जातील.

‘एमएचएम’ मूल्य साखळीच्या सर्व पैलूंच्या दृष्टिकोनातून टाटा ट्रस्टस समूह सरकारी अधिकारी, स्थानिक हितधारक व समान विचारधारेच्या संस्थांसोबत भागीदारी करणार असून, यामुळे प्रत्यक्ष ठिकाणी काम करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या क्षमता वाढवून स्थिरता सुनिश्चित होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search