Next
रवींद्र तळपे यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश
प्रेस रिलीज
Wednesday, September 26, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this article:मुंबई : राज्यातील आदिवासींच्या हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

या वेळी ‘भाजप’च्या राष्ट्रीय अनुसुचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष खासदार अशोक नेते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र भोये, महामंत्री तुळशीराम गावित, प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाचे संघटन मंत्री कृष्णराव चव्हाण उपस्थित होते. तळपे यांची प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे या प्रसंगी जाहीर करण्यात आले. ‘भाजप’च्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

तळपे यांनी राज्यातील आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात तब्बल २६ जनहित याचिका दाखल केल्या आहेत. आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृह सुधारणांसाठी तळपे हे अनेक वर्षांपासून शासकीय दरबारी संघर्ष करीत आहेत. त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठीही त्यांनी लढा दिला आहे .

‘भाजप’ची अनुसुचित जमातीच्या उन्नतीसाठी आखलेली धोरणे समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहेत, त्यात आणखी काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण सूचना करणार असल्याचे तळपे यांनी सांगितले.

वैद्यकीय प्रवेशमध्ये आदिवासींच्या नावाने होणारी घुसखोरी ओळखून त्याला आळा घालण्यासाठी एकाच वेळी तीन-तीन याचिका त्यांनी दाखल केल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण व सुसूत्रीकरण करून समित्या बळकट करण्यात, तसेच पेसाविरोधी आदिवासींच्या जमीन अधिग्रहणाच्या निर्णयांना कायदेशीर आव्हान देण्यात तळपे यांची भूमिका आदिवासी समाजाला सर्वश्रुत आहे. तळपे यांनी यवतमाळमधील कुमारीमातांच्या पुनर्वसन व इतर समस्यांबाबत विविध उपाययोजना सुचवून त्यांना न्याय मिळवून दिला.

‘भाजप हा इतर पक्षांपेक्षा वेगळा केडरबेस पक्ष आहे. ‘भाजप’ जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. ‘भाजप’ची सभासद संख्या साडेअकरा कोटी आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसमुक्त भारत होणारच आहे. तळपे यांच्या प्रवेशाने ‘भाजप’ आदिवासी क्षेत्रात नक्कीच मजबूत होणार आहे,’ असे खासदार नेते यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search