Next
‘महिंद्रा’ची इलेक्ट्रिक व्हेइकल केरळमध्ये दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, September 19, 2018 | 02:35 PM
15 0 0
Share this article:

कोचीन : महिंद्रा लॉजिस्टिक्स (एमएलएल) या भारतातील थ्रीपीएल सेवा देणाऱ्या एका सर्वात मोठ्या कंपनीने केरळमधील कर्मचारी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (ईव्ही) समावेश केला आहे. ही वाहने महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.ची ईव्हेरिटो मॉडेल्स असून, ती फ्लीट सेग्मेंटसाठी पसंतीची ‘ईव्ही’ आहेत व कर्मचारी वाहतुकीसाठी राज्यात प्रथमच दाखल केली जाणार आहेत.

‘एमएलएल’ने बंगळुरू, दिल्ली अशा शहरांत आपल्या ग्राहकांसाठी ‘ईव्ही’ अगोदरच दाखल केली आहेत आणि आगामी आर्थिक वर्षात पीपल ट्रान्सपोर्टेशन सोल्यूशन्स (पीटीएस) व्यवसायाचा भाग म्हणून १५० वाहने वापरण्याचे नियोजन आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘आमच्या दृष्टीने इलेक्ट्रिक व्हेइकल्स म्हणजे महिंद्रा समूहाच्या फ्युचर ऑफ मोबिलिटी या उद्देशाचे प्रतिक आहेत. जगभरातील ग्राहकांसाठी वाहतुकीचे माध्यम उपलब्ध करेल, अशी शाश्वत ऑटोमोटिव्ह व्यवस्था. महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये आम्ही पर्यावरणपूरक उपाय स्वीकारण्याची गरज असल्याचे मानतो आणि आमचे व्यवसाय त्यानुसार चालवले जातात. या वाहनांद्वारे आम्ही केरळमध्ये प्रवेश करत आहोत आणि हरित भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहोत.’

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही जवळजवळ दशकभर इलेक्ट्रिक वाहतुकीची चळवळ उभारत आहोत. २०१६पासून केरळ ही आमच्यासाठी उदयोन्मुख बाजारपेठ ठरली आहे आणि आज महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून ईव्हेरिटो ही फ्लीट सेग्मेंटमध्ये दाखल होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ‘ईव्हीं’चा अवलंब करण्याचे परिवर्तन घडून येण्यासाठी फ्लीट सेग्मेंट चालना देईल, असे आम्हाला वाटते. शाश्वत जगणे, या राज्याच्या उद्दिष्टामध्ये, या निर्णयामुळे मोठे योगदान दिले जाईल, असा विश्वास आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search