Next
रत्नागिरी नगर वाचनालयाच्या स्पर्धांचा निकाल जाहीर
BOI
Wednesday, February 27, 2019 | 12:07 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगुळकर (गदिमा) आणि संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्व सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय निबंधलेखन व कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज (२७ फेब्रुवारी) या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये निबंध स्पर्धेसाठी १३० स्पर्धकांनी, तर कथाकथन स्पर्धेसाठी ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. निबंध स्पर्धेसाठी योगिनी भागवत, नंदन ढापरे, रवींद्र पाटणकर, जयश्री बर्वे, अस्मिता फाटक व पूजा कात्रे या गुरुजनांनी परीक्षक म्हणून काम पहिले. कथाकथन स्पर्धेसाठी सुहास विद्वांस, पूजा कात्रे, योगिनी भागवत, अस्मिता फाटक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

निबंध स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली होती. आठवी ते दहावी या गटात वेदिका प्रकाश गुरव (विश्वेश्वर विद्यामंदिर, गावडे आंबेरे), पृथा राजीव ठाकूर (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), सृष्टी दिलीप गुरव (स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिर, पावस) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तुतीय क्रमांक, तर रिया सचिन पटवर्धन (जीजीपीएस, रत्नागिरी), तनिष्का सर्जेराव पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा), तन्वी मकरंद फडके (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरी) व तनुजा हिरामण कोतवाल (श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. अकरावी ते पदवी दुसऱ्या गटात नंदिनी सुधीर डोंगरे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), कल्पेश आत्माराम पारधी (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाटपन्हाळे, गुहागर), मनाली शैलेश जोशी (ए. जी. हायस्कूल, दापोली) यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, तर निशांत प्रदीप गगनग्रास (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण), जान्हवी विद्याधर दाबके (ए. जी. ज्युनिअर कॉलेज, दापोली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. खुल्या गटात अर्चना अशोक देवधर, नयना रमेश आठल्ये, रामचंद्र आनंदा चव्हाण पाटील यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, तर प्राची प्रकाश घाणेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

कथाकथन स्पर्धेच्या आठवी ते दहावी या गटात पूजा संजय गोगटे (पावस हायस्कूल, रत्नागिरी), अमृत विश्वनाथ शिंदे (जीजीपीएस, रत्नागिरी) अंकिता अविनाश जाधव (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, तर श्रेया हरिदास पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा) व हर्ष सुरेंद्र नागवेकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. अकरावी ते पदवी या गटात विजय दत्ताराम सुतार (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) यांना प्रथम क्रमांक देण्यात आला, तर खुल्या गटात आनंद शेलार (पावस, रत्नागिरी), मीरा पोतदार (चिपळूण) व बाबुराव पाटील (दापोली) यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, तर राधा दिनेश रायकर (चिपळूण), राजश्री प्रदीप साने (रत्नागिरी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी निबंध व कथाकथन स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link