Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात विवेक वाहिनी समिती
BOI
Wednesday, August 21, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this article:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विवेक वाहिनी समितीच्या उद्घाटनप्रसंगी मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, डॉ. शिवलिंग मेनकुदळे आदी

पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विवेक वाहिनी समिती स्थापन करण्यात आली आहे. नुकतेच या समितीचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर आणि मिलिंद देशमुख यांच्या उपस्थितीत झाले. 


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी विवेकी विचार करून सत्याचा शोध घ्यायला हवा. आजच्या तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता व्यायामाकडे आणि प्राणायमाकडे वळायला हवे. विवेकी विचार करणारी माणसेच जग घडवतात.’

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना विवेकी विचार करून योग्य निर्णय घेता यावा. यासाठी विवेक वाहिनीसारखी समिती महाविद्यालयात कार्यरत आहे.’


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले, ‘महाराष्ट्राचा नैतिक वारसा संपवण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून झालेला दिसतो. चार्वाक,  गौतम बुद्ध,  महात्मा फुले,  गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर इतर सुधारकांना संपवलेले दिसते. माणूस मेल्याने त्याचे विचार संपत नसतात. महाराष्ट्राबरोबरच जगभर विवेकी विचार पोहचविण्याचे कार्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत आहे.’

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. कुशल पाखले यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल रेडे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. सविता पाटील, डॉ. राजेंद्र रासकर, डॉ. रणदिवे, डॉ. सुशीलकुमार गुजर, प्रा. प्रदीप भिसे, प्रा. किरण कुंभार उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search